13 January 2025 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Samsung Galaxy A54 5G | सॅमसंग Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये प्रीमियम फीचर्स, कॅमेरा आणि किंमत

Samsung Galaxy A54 5G

Samsung Galaxy A54 5G | सॅमसंग आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग Galaxy A54 5G लवकरच बाजारात उतरवणार आहे. काही लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, गॅलेक्सी ए ५४ ५ जी हा या सीरिजमधील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असेल. फोनच्या लाँचिंगच्या तारखेबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या समाप्तीपूर्वी ते बाजारात दाखल होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फोन लाँच करण्यासाठी अजून काही अवधी आहे, मात्र यादरम्यान टिप्स्टर योगेश ब्रार यांनी या आगामी हँडसेटमधील लीक स्पेसिफिकेशन्स शेअर केले आहेत.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
लीकनुसार, सॅमसंगच्या या 5 जी फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120 हर्ट्जच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. याशिवाय कंपनी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉक सपोर्ट देखील देऊ शकते. हा फोन ६ जीबी आणि ८ जीबी रॅम ऑप्शनमध्ये येईल, असा दावा टिप्स्टरने केला आहे. यामध्ये तुम्हाला 128 जीबी आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजचा पर्यायही मिळेल.

रियरमध्ये तीन कॅमेरे
प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये एक्सिनॉस 1380 चिपसेट देणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये तीन कॅमेरे असतील. द वर्जनुसार, कंपनी 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सोबत 50 मेगापिक्सलचा ओआयएस मेन कॅमेरा देऊ शकते. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

बॅटरी
स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh असेल, जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनी या फोनसोबत चार्जर देणार की नाही, हे आताच निश्चित सांगता येणार नाही. ओएसच्या बाबतीत बोलायचे झाले तर, फोन अँड्रॉइड 13 वर आधारित वनयूआय 5.0 वर काम करेल. हा फोन लाइम ग्रीन, पर्पल, ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Samsung Galaxy A54 5G smartphone price in India check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

#Samsung Galaxy A54 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x