12 January 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम
x

Tecno Spark 9 5G Smartphone | भारतात आज लाँच होणार दमदार टेक्नो स्पार्क 9 स्मार्टफोन, स्वस्त किंमत आणि फीचर्स पहा

Tecno Spark 9 5G Smartphone

Tecno Spark 9 5G Smartphone | टेक्नो आपला नवीन स्पार्क ९ भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे. नवीन टेक्नो स्पार्क अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला असून, त्याची किंमत मायक्रोसाइटवरही पाहता येणार आहे. या साईटवर टेक्नोचा नवा फोन ९,४९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला असून आज हा फोन अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार असून त्यानंतर फोनची उर्वरित माहिती आणि फीचर्स कळणार आहेत. फोनमध्ये ६ जीबी परमनंट रॅम आणि ५ जीबी व्हर्चुअल रॅम असणार असल्याचे समोर आले होते.

11 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज :
11 जीबी रॅम व्यतिरिक्त, फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येणार असल्याचे समजते. हा फोन इन्फिनिटी ब्लॅक आणि स्काय मिरर या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे.

6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले :
टेकनो स्पार्क 9 मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल, जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ३७ चिपसेट देण्यात येणार आहे. फोनची ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड १२ वर आधारित असेल.

ड्युअल कॅमेरा सेटअप आणि आयलंडवर ३ कॅमेरा स्लॉट :
टेक्नो स्पार्क ९ मध्ये कॅमेऱ्याला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत असल्याने. फोनच्या कॅमेरा आयलंडवर तीन कॅमेरा स्लॉट आहेत पण तिसरा स्लॉट फक्त डमी म्हणून आहे. फ्लॅश प्राथमिक कॅमेऱ्याच्या शेजारी ठेवला आहे. रिपोर्टनुसार, याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल युनिटचा असेल. टेकनोने बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सरचाही समावेश करून कॅमेरा आयलंडवर ठेवला आहे. याच्या फ्रंट पॅनेलमध्ये सिंगल फ्रंट-फेसिंग कॅमेरा लेन्ससह वॉटर ड्रॉप नॉच असेल.

डीटीएस सह स्पीकर मिळतील :
या फोनमध्ये माहितीनुसार टेक्नो स्पार्क ९ मध्ये डीटीएस पॉवर्ड स्पीकर्स मिळतील. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतात याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. ११ जीबी रॅम असलेला हा पहिला स्मार्टफोन असेल, असा दावा केला जात आहे. पॉवरसाठी टेक्नो स्पार्क 9 मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tecno Spark 9 5G Smartphone will launch today check price details on Flipkart 18 July 2022.

हॅशटॅग्स

#Tecno Spark 9 Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x