17 November 2024 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Westinghouse TV | अमेरिकन ब्रँड वेस्टिंगहाऊसने भारतात 3 नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केले | जबरदस्त फीचर्स पहा

Westinghouse TV

Westinghouse TV | गेल्या वर्षी वेस्टिंगहाऊसने भारतात आपले स्मार्ट आणि नॉन-स्मार्ट टीव्ही दाखल केले होते. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलियोमध्ये तीन नवीन मॉडेल सादर केले आहेत. जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पोर्टफोलिओमध्ये तीन नवीन मॉडेल्स :
वेस्टिंगहाऊसने गेल्या वर्षी भारतात नॉन-स्मार्ट आणि स्मार्ट टीव्ही यशस्वीपणे लाँच केल्यानंतर, अमेरिकन ब्रँडने आपल्या पोर्टफोलिओमध्ये तीन नवीन मॉडेल्स 32-इंच नॉन-स्मार्ट टीव्ही, 43 इंच यूएचडी आणि 50-इंच यूएचडी स्मार्ट टीव्ही जोडले आहेत. भारतात याची सुरुवातीची किंमत 7999 रुपये आहे. नवीन स्मार्ट टीव्ही धन्सू पिक्चर क्वालिटी, साऊंड टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट फीचर्ससह आले आहेत, जे भारतातील सर्वात मोठ्या टीव्ही उत्पादकांपैकी एक असलेल्या एसपीपीएलने डिझाइन आणि तयार केले आहेत. नव्या टीव्ही मॉडेलबद्दल सर्व काही सविस्तर जाणून घेऊया.

कसे आहेत वेस्टिंगहाऊसचे टीव्ही
कंपनीने आता ३२ इंचाचा नॉन स्मार्ट टीव्ही, ४३ इंचाचा यूएचडी आणि ५० इंचाचा यूएचडी असे स्मार्टटीव्हीचे तीन मॉडेल्स लाँच केले आहेत. टीव्हीची किंमत ७,९९९ रुपयांपासून सुरू होते. ऍमेझॉनवर १३ जूनपासून हे तीन मॉडेल्स आपण खरेदी करू शकता. आता या तिन्ही मॉडेल्सची आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

तीन मॉडेल्स – फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
१. ३२ इंचाचा नॉन स्मार्ट टीव्ही-
३२ इंचाच्या नॉन स्मार्ट टीव्ही मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. जे एलईडी स्क्रीन, एचडी रिझोल्यूशन आणि 2 एचडीएमआय, 2 यूएसबी पोर्टसह येते. मॉडेलमध्ये 20 वॉट ऑडिओ आउटपुट, डिजिटल नॉईज फिल्टर, ऑटोमॅटिक व्हॉल्यूम लेव्हल, ऑडिओ इक्वलायझरसह 2 स्पीकर्स आहेत, जे एमपी 3 / डब्ल्यूएमए ऑडिओ फॉरमॅटला सपोर्ट करतील.

२. ४३ इंच आणि ५० इंच स्मार्ट टीव्ही-
४३ इंच यूएचडी / 4के मॉडलची किंमत 20,999 रुपये आहे. ५० इंच यूएचडी/ ४के टीव्हीची किंमत २७,९ रुपये आहे. जी २ जीबी रॅम, ८ जीबी रॉम, ३ एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्टला सपोर्ट करेल. ही मॉडेल्स एचडीआर १०, क्रोमकास्टसह येतात, जे बाजारात हाय-एंड टीव्हीच्या समतुल्य आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये 2 स्पीकर्स, एक डिजिटल नॉईज फिल्टर आणि 40 वॅटचे स्पीकर आउटपुट आहे, जे सराउंड साउंड तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज आहे.

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम :
या स्मार्ट टीव्हींना अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून, यामध्ये वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून अनेक एप्स आणि गेम्स उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युजर्सला रिमोटच्या एकाच टचने ऍमेझॉन प्राइम, यू ट्यूब आणि सोनी लिव्ह ऍक्सेस करता येईल.

अलॉय स्टँडसह आकर्षक डिझाइन :
५०० निट्स ब्राइटनेस, बेझल-लेस डिझाइन, ४के रिझोल्यूशन, गुगल असिस्टंट, आयपीएससह ४३ इंच आणि ५० इंचाच्या टीव्हीवर एक प्रकारचा हाय-व्हिज्युअल सिनेमा पाहण्याची संधी वापरकर्त्यांना मिळणार आहे. दोन्ही टीव्हीमध्ये पॅनल, ड्युअल बँड वायफाय, ६०+ एप्स आणि गेम्स उपलब्ध, अलॉय स्टँडसह आकर्षक डिझाइन आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Westinghouse TV with best online offer on Amazon check details 10 June 2022.

हॅशटॅग्स

# Westinghouse TV(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x