5 February 2025 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

आता व्हॉट्सअँप मेसेज ट्रेस करता येणार.

IIT Madras, Whatapp Message, Tress

मुंबई : व्हॉट्सअँप म्हणजे सध्याच्या काळात दोन व्यक्तींना जोडणारा दुवा आहे. हे मेसेज व्हॉट्सअँप कंपनी किईव एखादी एजन्सी अथवा कोणताही तिसरा व्यक्ती वाचू शकत नाही. तुमचे मूळ मेसेज हे कोणीही ट्रेस करू शकत नाही. त्यामुळेच कित्येक वेळा अफवा पसरवल्या जातात. तेच मेसेज कित्येक लोकांना फॉरवर्ड केले जातात. मात्र त्यामुळे लोकांची फसवणूक होते व खोटे मेसेज लोकांपर्यंत पोहोचतात.

पण हे खोटे मेसेज कोण बनवत आणि मग ते फॉरवर्ड केले जातात हे आता ट्रेस करता येणं शक्य होणार आहे. असा दावा आयआयटी मद्रासच्या प्राध्यापकांनी कोर्टात केला आहे. व्हॉट्सअँपमध्ये मेसेज पाठवणाऱ्याला ट्रेस करता येऊ शकत अशा प्रकारचं टूल कंपनीने तयार करावं असं भारत सरकारने अनेकदा व्हॉट्सअँप कंपनीला सांगितलं होत. बोगस वृत्त आणि अफवांवर नियंत्रण आणणे हा त्यामागील उद्देश आहे.

मात्र हे शक्य नाही असं व्हॉट्सअँप ने सांगितलं होत. आता व्हॉट्सअँप वरील मूळ मेसेज ट्रेस करता येणं तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचा दावा आयआयटी मद्रासचे प्राध्यापक व्ही. कमाकोटी यांनी मद्रास हायकोर्टात केला आहे. त्यामुळे आता खोटे मेसेज अफवा पसरण नक्कीच बंद होईल. त्यामुळे लोकांची फसवणूक करणारे लोक पकडले जातील.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x