15 November 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - भारतातील क्रांतीकारी चळवळ

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे भारतातील क्रांतीकारी चळवळ. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर भारतातील क्रांतीकारी चळवळ बद्दलची सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

भारतातील क्रांतीकारी चळवळ:

  • 1857 चा उठाव अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र संघर्षाचा मार्ग भारतीयांनी सोडून दिला.
  • भारतात राष्ट्रवाद मूळ धरू लागला होता. त्याचेच पर्यावसन म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होय.
  • 1885 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा सुरुवातीला नेमस्तपंथीय होती. पुढे बदलत्या परिस्थितीमुळे ती जहालवादी बनू लागली.
  • राणीच्या जाहीरनाम्यातील आश्र्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीतच, उलट भारतीय जनतेची आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली.
  • ब्रिटिशांच्या धोरणामुळेच आपला देश दरिद्री बनला हे भारतीयांना कळून चुकले.
  • ब्रिटिशांचे वर्णद्वेशाचे धोरणही भारतीयांना जाचक ठरु लागले. उच्च परीक्षा उत्तीर्ण करुनही भारतीयांना प्रशासनात घेतले जात नव्हते.
  • ब्रिटिश साम्राज्य भारतावर हजारो वर्षे चालणार अशी भाषा इंग्रज वापरत. अर्थात उन्मत राजसत्तेचे ते प्रताप होते. या सर्व अन्यायाची, अत्याचाराची हकीकत जनतेला नेत्यांकडून, वृत्तपत्रांतून कळत होती.
  • केसरी, मराठा, न्यूइंडिया, टि्रब्यून, इत्यादी वृत्तपत्रे, तसेच बंकिमचंद्र चेपाध्यय, रवींद्रनाथ टागोर, इत्यादीच्या साहित्यातून भारतीय जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.
  • तरुण वर्ग जहालवादाकडे झुकू लागला. तरुणांचा एक गट क्रांतिकारी मार्गाकडे वळला.
  • विशेषत: एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात दुष्काळाने व प्लेगाने प्रचंड थैमान घातले असता ब्रिटिशांनी जनतेप्रती जे सहानुभूतीशून्य धोरण अवलंबले, त्यामुळे अनेक तरुणांचे माथे भडकले.
  • जहालवादी आणि दहशतवादी क्रांतिकारी यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारतमातेला परकीय दास्यांच्या शृखंलेतून मुक्त करणे. मात्र त्यांच्यात साधनांची, मार्गांची तफावत होती. जहालवादी विचारसरणीत हिंसेला स्थान नव्हते.
  • केवळ ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करुन देशाचे स्वातंत्र्य मिळणार नाही. असे त्यांचे मत होते.
  • असे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या दहशतवादी क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल जहालवाद्यांना सहानुभूती होती, हिसेने, पाशवी बलाने निर्माण झालेले साम्राज्य त्याच मार्गाने खुडून फेकणे शक्य आहे, नव्हे तोच मार्ग योग्य आहे अशी क्रांतिकारकांची धारणा होती. एखाद्या ब्रिटिश अधिकार्‍याला ठार मारुन मूळ प्रश्न सुटणार नाही हे क्रांतिकारकांनाही मान्य होते पण निर्माल्यवत बनलेल्या देशाला खडबडून जागे करण्यासाठी असे वध उपयुक्त ठरतील ही त्यांची श्रध्दा होती.
  • प्रखर राष्ट्रनिष्ठ व त्यांच्या विचारांचा आधार होता. म्हणूनच देशासाठी प्राणार्पण करणे, हुतात्मा बनणे, इत्यादी गोष्टी क्रांतिकारकांना अभिमानास्पद वाटत होत्या.

वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य:

  • भारतातील क्रांतिकार्याची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.
  • वासुदेव बळवंताचा जन्म 1845 मध्ये झाला.
  • रेल्वे खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या ब्रिटिश नोकरशाहीशी जवळून संबंध आला.
  • ब्रिटिश प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उद्दाम, उर्मट व अपमानास्पद वागणुकीमुळे तरुण वासुदेवांचे रक्त खवळून उठले. त्यातूनच त्यांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचे स्फ़ुलिंग प्राज्वलित झाले.
  • अशा स्थितीत आपल्या आईला भेटण्यासाठी वासुदेव बळवंत फडकेंनी रजा मागितली. ती नाकारल्याने त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले.
  • त्याच क्षणी ब्रिटिशांची अत्याचारी राजवट उलथून पाडण्याचा निर्धार वासुदेव बळवंतांनी केला.
  • 1857 चा संघर्ष होऊन फार कालावधी लोटला नव्हता.
  • संघर्षाच्या हकिकती ऐकून वासुदेव बळवंत रोमांचित होत.
  • ब्रिटिशांशी झुंज देणार्‍या तात्या टोपे व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता.
  • आपणही असेच काहीतरी केले पाहिजे असे फडके यांना मनोमन वाटत होते. याचा सुमारास महाराष्ट्र्रात भयंकर दुष्कार पडला. सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ लागले.
  • अशा परिस्थितीत वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश राज्यकर्त्याविरुध्द भाषणे देऊन जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.
  • या मार्गाने यश मिळत नाही असे दिसताच वासुदेव बळवंत फडक्यांनी पश्चिम महाराष्ट्र्राचा दौरा करुन, तेथील रामोशांना संघटित करण्याचे कार्य केले.
  • ब्रिटिश साम्राज्याबरोबर टक्कर द्यायची म्हणजे शस्त्रास्त्रे आवश्यक होती आणि त्यासाठी पैसा पाहिजे होता. म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी रामोशांच्या साहाय्याने धनिकांवर दरोडे टाकण्यास प्रारंभ केला. म्हणूनच काही लोक त्यांना दरोडेखोर म्हणू लागले.
  • पण हे दरोडे पोटासाठी नसून देशासाठी होते हे विसरता कामा नये. रामोशांच्या साहाय्याने तारायंत्र उद्ध्वस्त करणे.
  • तुरुंगावर हल्ले करुन कैद्याना मुक्त करणे व त्यांना आपल्या कामात घेणे, दळणवळण यंत्रणा निकामी बनवणे असे कार्य वासुदेव बळवंत फडके यांनी सुरु केले.
  • ब्रिटिश सरकारच्या मार्गात होता होईल तितके अडथळे निर्माण करणे हा त्यामागील हेतू होता. पण त्याचबरोबर वासुदेव बळवंत गोरगरिबांना मदत करत असल्याने त्यांना परमेश्र्वर मानले गेले.
  • हळूहळू त्यांच्या कार्यात महत्व सरकारच्या नजरेत आले. म्हणूनच वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी बक्षीस लावले गेले.
  • त्याला प्रत्युत्तर म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी असे जाहीर केले की, मुंबईचे गव्हर्नर रिर्चड टेंपल यांचे शीर कापून आणणार्‍यांस अधिक बक्षीस दिले जाईल.
  • अनेक दिवस प्रयत्न करुनही सरकारला वासुदेव बळवंतांचा पत्ता लागला नाही. शेवटी 27 जुलै 1879 रोजी डॅनियल नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांना पकडण्यात यश मिळवले.
  • त्या वेळी वासुदेव बळवंत आजारी असल्याने एका मंदिरात असाहाय्य अवस्थेत होते.
  • पुण्याच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्या वेळी फार मोठा जनसमुदाय तेथे उपस्थित असे.
  • जनतेने स्वयंस्फूर्तीने वासुदेव बळवंत फडक्यांच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला.
  • परंतु अखेर ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंतांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून त्यांना दूर एडनच्या तुरुंगात ठेवले.
  • तुरुंगांत वासुदेव बळवंतांचे अतोनात हाल करण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि 1883 च्या फेब्रुवारीमध्ये या महान देशभक्ताची प्राणज्योत मालवली.

कुका आंदोलन:

  • महाराष्ट्र्रात वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकार्य केले, तसेच कार्य पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी चालवले.
  • ब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली. आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली.
  • पण ब्रिटिशविरोध रोमरामात भिनलेल्या रामसिंह कुकांचे मन धर्मकार्यात गुंतून पडले नाही. परिणामी त्यांच्या संप्रदायाचे रुपांतर लवकरच एका क्रांतिदलात झाले.
  • ठिकठिकाणी आपले अनुयायी पाठवून रामसिंह कुकांनी जनतेत, विशेषत: सैन्यात ब्रिटिशविरोधी भावना भडकवण्याचे कार्य केले. त्याचबरोबर ठिकठिकाणाहून शस्त्रास्त्रे गोळा केली.
  • ब्रिटिश साम्राज्याविरुध्द कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांचे हे कुका आंदोलन अतिशय गुप्तपणे सुरु होते.
  • अखेर या आंदोलनाची माहिती सरकारला मिळालीच प्रचंड प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कुका आंदोलन पुर्णपणे चिरडून टाकण्यात आले.
  • कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि स्वत: रामसिंह कुकांना ब्रम्हदेशात हद्दपार करण्यात आले.
  • तेथेच 1885 मध्ये त्यांचा अंत झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य:

  • एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात दुष्काळ व प्लेगने संपूर्ण महाराष्ट्र्राला भयभीत करुन टाकले.
  • मात्र जनता जास्त भयभीत झाली ती ब्रिटिश अधिकार्‍यांच्या दडपशाहीने.
  • प्लेगचा रोगी लपवून ठेवला जातो या कारणाखाली सरकारी कर्मचारी घराघरांत घुसून शोधकार्य करत असत. या दंडेलीतून स्त्रियांही सुटल्या नाहीत.
  • देवघरात घुसून जनतेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या. ब्रिटिशांची ही खबरदारी म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम असा प्रकार ठरला. परिणामी लोक संतापले.
  • या वातावरणात 22 जून 1897 रोजी पुण्याचे प्लेग अधिकारी रॅंड व आयर्स्ट यांचे खून झाले. जनतेच्या प्रक्षोभाचे ते प्रतीक होते.
  • या खुनाबद्दल दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव या चाफेकर बंधूंना सरकारने फासावर लटकवले. या घटनेने संपूर्ण देश विस्मयचकित झाला, तसा जागृतही झाला. स्वत: लोकमान्य टिळकांनी रॅड वधाचे नैतिक समर्थन केले.
  • वरील घटनेपासून स्फूर्ती घेऊन विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा नावाची संस्था स्थापन केली.
  • पुढे 1904 मध्ये या संस्थेचे नाव अभिनव भारत असे ठेवले. शास्त्राशिवाय स्वातंत्र्य नाही. अशी सावरकरांची विचारसरणी होती.
  • महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अभिनव भारताच्या शाखा निघाल्या.
  • इटलीचा देशभक्त स्वातंत्र्यवीर मॅझिनी यांच्या चरित्राचा मराठीत अनुवाद सावरकरांनी केला.
  • मॅझिनीचे आदर्श भारतीयांसमोर ठेवावे म्हणजे त्यातून देशकार्याची प्रेरणा मिळेल, असा त्यामागे सावरकरांचा उद्देश होता.
  • 1906 मध्ये सावरकर इंग्लंडला गेले व तेथून भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पिस्तुले काडतुसे पुरवू लागले.
  • त्यांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे वडील बंधू गणेशपंत सावरकर चालवत असत. या वेळी देशासाठी बलिदान करण्याची तयारी असलेल्या तरुणांनी महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अनेक गुप्त संस्था चालवल्या होत्या, त्यांच्याशी अभिनव भारत संस्थेचा संर्पक होता.
  • इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य जोरात सुरु होते.
  • 1907 मध्ये 1857 च्या संघर्षाला 50 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा संघर्ष म्हणजे भारतीय स्वांतत्र्य संग्राम होय. असे परखड प्रतिपादन सावरकरांनी केले.
  • 1908 मध्ये लंडन येथे सावरकरांजवळून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करुन त्यांना अटक केली. त्यांना भारतात घेऊन येणारे जहाज फ्रान्सच्या मर्सेलिस बंदरात येताच सावरकरांनी सागरात उडी मारुन निसटण्याचा प्रयत्न केला.
  • त्यांच्या पाठोपाठ इंग्रज शिपायांनी सागरात उडया घेतल्या. सावरकर पोहतपोहत किनार्‍यावर आले आणि फ्रेंच शिपायांना फ्रांन्समध्ये संरक्षण मिळण्याबाबत समजावून सांगू लागले.
  • परंतु त्यांची भाषा फ्रेंच शिपायांच्या लक्षात येईना. तेवढयात इंग्रज शिपायांनी सावरकरांना पुन्हा अटक केली. भारतात आल्यावर नाशिक खटल्याबाबत त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे इंग्लंडमधील क्रांतिकार्य लक्षात घेऊन त्यांच्या गणेशपंत या वडीलबंधूंवर नाशिक येथे सरकारची करडी नजर होती.
  • 1908 मध्ये त्यांच्याजवळ बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.
  • सरकारने ताबडतोब गणेशपंतांवर खटला चालवून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेखाली अंदमानात पाठवले. यामुळे नाशिकमधल्या क्रांतिकारी गटाने ब्रिटिश अधिकार्‍यांवर दहशत बसवण्याचा निश्चय केला.
  • अभिनव भारताच्या अनंत कान्हेरे नावाच्या सदस्याने नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
  • नाशिक कटाच्या खटल्यात कान्हेरे, कर्वे व देशपांडे या नाशिकच्या क्रांतिकारकांना फाशिची शिक्षा देण्यात आली.
  • याच नाशिक खटल्यात गोवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगण्याइतका तू जगशील का? अशा अर्थाचा सवाल विचारणार्‍या तुरुंगाधिकार्‍याला सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का ? सावरकर बंधूंनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, सावरकरांची सागरातील उडी, अंदमानच्या तुंरुंगात त्यांनी भोगलेल्या यमयातना या सर्व घटनांमुळे भारतीय जनतेत स्वातंत्र्याची जबरदस्त उर्मी निर्माण झाली.

बंगाल इतर प्रांतांतील क्रांतिकार्य:

  • महाराष्ट्र्राप्रमाणेच बंगालही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते.
  • स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांनी तेथे अनुशीलन समिती नावाची गुप्त संस्था स्थापन केली.
  • अशीच एक संस्था कलकत्ता यातही निघाली. दुष्टांचे निर्दालन करणारी कालीमाता हे या तरुणांचे दैवत होते, समितीतर्फे तरुणांना लाठयाकाठयांचे शिक्षण देण्यात येई. तरुणांमध्ये लढाऊ बाणा यावा हा त्यामागील उद्देश होता.
  • डाक्का अनुशीलन समिती व कलकत्ता अनुशीलन समिती यांच्या शाखा प्रामुख्याने बंगालमध्ये सर्वदूर पसरल्या होत्या आणि त्यांचे शेकडोंच्या संख्येने सदस्य होते.
  • अरविंद घोष यांचे बंधू वीरेंद्रकुमार घोष आणि स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंन्द्रनाथ दत्त यांचा बंगालमधील क्रांतीकार्यात महत्वाचा वाटा होता.
  • वीरेंद्रकुमार घोष यांनी युगांतर वृत्तपत्राद्वारे बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे कार्य केले. त्या वेळी बंगालमध्ये अनेक क्रांतिकारी संस्था गुप्तपणे कार्यरत होत्या.
  • र्लॉड कर्झन यांनी बंगालची फाळणी केल्यावर बंगालमध्ये असंतोषाचा प्रचंड भडका उडाला.
  • हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी बाँब बनवण्याची कला अवगत करुन घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्याच्याजवळ बॉब तयार करण्याचे कार्य सुरु झाले.
  • या बाँबचा पहिला प्रेयोग पूर्व बंगाल प्रांताचा पहिला नायब राज्यपाल मुस्लिमांना झुकते माप देणारा जॉन बाम्फिल्ड फुल्लर याच्यावर करण्यात आला, पण त्यात यश मिळाले नाही.
  • या व्यतिरिक्त अनेक ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करण्यात आल्याने सरकार खडबडून जागे झाले. अशाच एका प्रयत्नात खुदीराम बोस पकडले जाऊन त्यांना फासावर लटकवण्यात आले. या वेळी अनेकांना पकडण्यात आले.
  • सर्वांवर अलिपूरच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. तो अलिपूर खटला या नावाने प्रसिध्द आहे.
  • या खटल्यातील सरकारी वकील आशुतोष विश्र्वास व पोलिस अधिकारी शम्स ललम या दोघांचाही न्यायालय परिसरातच हत्या करण्यात आली.
  • या खटल्याच्या निमित्ताने बंगालमधील क्रांतिकारकांच्या गुप्त कार्याची माहिती मिळाल्याने सरकार अतिशय अस्वस्थ झाले.
  • कारण क्रांतिकारकांचे गुप्त जाळे दूरवर विणले गेले होते आणि त्यांच्यामार्फ़त परदेशातही शस्त्रास्त्रे पाठवली जात होती.
  • अलिपूर खटल्यानंतर कलकत्ता याच्या अनुशीलन समितीचे कार्य बरेच थंडावले पण ढाक्का येथील अनुशीलन समितीतर्फे बंगालमधील तरुणांना देशकार्यासाठी उत्तेजित करण्याचे, शस्त्रास्त्रे निर्माण करण्याचे कार्य सुरुच होते.
  • महाराष्ट्र्र आणि बंगालप्रमाणे पंजाबमध्येही क्रांतिकार्य सुरु होते.
  • तेथील गुप्त क्रांतिकारी संस्था लाला हरदयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालत होती, या कार्याला लाला लजपतराय यांचा आशीर्वाद होता.
  • पुढे 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत गेल्यावर पंजाबमधील त्यांचे कार्य रासबिहारी बोस यांनी चालवले.
  • दक्षिण भारतात पुदुच्चेरी हेही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते. उत्तर प्रदेशातही प्रामुख्याने वाराणसी येथे क्रांतिकारकांचे कार्य सरु होते.
  • 1909 मध्ये अहमदाबाद येथे व्हाईसरॉय र्लॉड मिंटो आणि त्यांची पत्नी बग्गीतून जात असता त्यांच्यावर बाँब फेकण्यात आला. त्यातून ते दोघेही बचावले.
  • 1912 मध्ये व्हाईसरॉय र्लॉड हार्डिंग यांच्यावरही दिल्लीत बाँब फेकण्यात आला. त्यात हार्डिंग जखमी झाले.

भारताबाहेरील दहशतवादी चळवळ:

  • भारताबाहेर ज्यांनी क्रांतिकार्य केले त्यात शामजी कृष्ण वर्मा यांचा महत्वाचा वाटा आहे. ते 1897 मध्ये लंडनला स्थायिक झाले.
  • परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भारतीय तरुणांना शामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती देत.
  • या निमित्ताने देशभक्त तरुणांना एकत्र आणून राष्ट्रवादी गट तयार करणे हा त्यांचा उद्देश होता.
  • त्याद्वारे शामजी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत असत. शामजी कृष्ण वर्मा यांचे लंडनमधील घर पुढे इंडिया हाऊस म्हणून प्रसिध्द पावले. हे घर म्हणजे क्रांतिकारकाचे केंद्र होते.
  • ब्रिटिश सरकारवर टीका करणार्‍या लिखाणामुळे शामजींकडे सरकारची वृष्टी वळली. म्हणून शामजी वर्मा पॅरिसला गेले आणि तेथे क्रांतिकार्य करु लागले.
  • त्यांच्या अनुपस्थितीत लंडनचे केंद्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांभाळले. शामजी वर्मांकडून शिष्यवृत्ती घेऊन सावरकर इंग्लंडमध्ये आले होते.
  • त्यावेळी इंडिया हाऊसमध्ये क्रांतिकारकांचा जो संच निर्माण झाला, त्यांपैकी एक मदनलाल धिंग्रा होते.
  • जुलै 1909 मध्ये धिंग्रा यांनी भारतात राहिलेल्या साम्राज्यवादी मनोवृत्तीवरच्या कर्झन वायली नावाच्या इंग्रज अधिकार्‍यावर लंडन येथे गोळया झाडल्या, त्यामुळे इंग्लंड सरकार अस्वस्थ झाले.
  • भारतातील क्रांतिकार्याचे जाळे दूरवर प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजधानीतही विणले गेलेले पाहून इंग्लंड सरकार सावध झाले आणि ताबडतोब इंडिया हाऊसवर डोळे रोखले गेले कर्झन वायलीचा खून करण्याच्या आरोपाखाली मदनलाल धिंग्रा फाशी गेले.
  • सावरकरांना नाशिक खटल्यांत गुंतवून अटक करण्यात आली त्यांची रवानगी भारतात केली गेली.
  • भारताबाहेरील क्रांतिकार्यात गदर चळवळीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ही चळवळ अमेरिकेत लाला हरदयाळ यांनी चालवली.
  • यापूर्व लालाजींनी भारतात असतांना लाहोर येथून क्रांतिकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने त्यांना यश मिळू शकले नाही.
  • म्हणून 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत आले. त्याआधीच नागपूरचे डॉ. पा. स. खानखोजे अमेरिकेत आले होते, त्यांचे संघटन लाला हरदयाळ यांनी केले.
  • लालाजींनी अमेरिकेत गदर नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्यावरुनच अमेरिकेतील क्रांतिकारी गटाचे कार्य गदर चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • या चळवळीला बर्‍याच अमेरिकनांची सहानुभूती होती.
  • अमेरिकेत कार्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी शाखाही स्थापन झालेल्या होत्या.
  • जवळच्या कॅनडातही गदर चळवळीच्या शाखा होत्या आणि शेकडो तरुण सदस्य होते.
  • पुढे ब्रिटिश सरकारचे लक्ष या कार्याकडे गेल्यावर लाला हरदयाळांना पकडण्यात आले. पण जामिनावर सुटका होऊन ते स्वित्झर्लंडमध्ये निघून गेले.
  • 1914 मध्ये पहिले महायुध्द सुरु झाले तेव्हा परदेशातील क्रांतिकारकांच्या कार्यावर ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने ते शक्य झाले नाही गदर गटाने इंग्लंडच्या शत्रुशीही संर्पक साधला.
  • विशेषत: शक्तिशाली जर्मनीची मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी लाला हरदयाळ स्वित्झर्लंडमधून जर्मनीत आले होते.
  • त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जर्मनीने शस्त्रास्त्रे आदी मदत करण्याचे कबूल केले, त्या दृष्टीने भारतात फार मोठे कारस्थान रचले गेले जे लाहोर कट म्हणून प्रसिध्द आहे.
  • जर्मनीने भारतावर हल्ला चढवावा आणि त्याच वेळी भारतात घुसलेल्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र उठाव करावा, शिपायांनी लढयास सुरुवात करावी अशी योजना होती.
  • पण सरकारच्या सर्तकतेमुळे व फितुरी झाल्याने लाहोर कट अपयशी ठरला, याशिवाय विष्णू पिंगळे व अनेकांना जन्मठेप झाली.

येथूनच भारतातील क्रांतिकारी चळवळ मागे पडत गेली.

क्रांतिकारक = क्रांतीकार्य

  • चाफेकर बंधू – 1897 साली पुण्याचा प्लेग कमिशनररैंड याची हत्या
  • स्वा.वि.दा. सावरकर – 1904 साली नाशिक येथे अभिनवभारत संघटनेची स्थापना
  • अनंत लक्ष्मण कान्हेरे – 1909 साली नाशिक येथे जॅक्सनची हत्या
  • बारींद्रकुमार घोष – संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन
  • अरविंद घोष – संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन
  • खुदीराम घोष प्रफुल्ल चाकी – 1908 साली किंग्जफोर्ड ला ठार करण्याचा प्रयत्न
  • रासबिहारी बोस – लॉर्ड हार्डिंग्जवर बाँब फेकण्याचे घाडसी कृत्य व जपानला पलायन क्रांतिकार्य चालू ठेवले
  • वांची अयर – ऍश या ब्रिटिश अधिकार्‍याची हत्या
  • श्यामजी कृष्ण वर्मा – इंडिया हाऊसची स्थापना
  • मादाम कामा – जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज फडकावला
  • मदनलाल धिंग्रा – कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याला ठार केले.
  • लाला हरदयाळ, भाई परमानंद. डॉ खानखोजे – भारताबाहेर गदर पक्ष्याची स्थापना गदर पक्षात सकि्रय सहभाग
  • विष्णू गणेश पिंगळे – 1915 साली गदर कटात सहभाग
  • वीरेंद्रनाथ चटटोपाध्याय, भूपेन दत्त हरदयाळ – बर्लिनमध्ये ब्रिटिशविरोधी कारवाया
  • महेंद्रप्रताप – काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना
  • चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिलागेश चटर्जी, मच्छिंद्रनाथ सन्याल, शफाक उल्लाखान, रोशनसिंग राजेंद्र लाहिरी – हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएनशची स्थापना, काकोरी कटात सहभाग
  • भगतसिंग, राजगुरूागतसिंग, बटुकेश्र्वर दत्त – साँडर्सची हत्या संसदेत बॉम्बस्फोट
  • सूर्य सेन, नंतसिंग गणेश घोष, कल्पना दत्त – चितगाव कटात सहभाग
  • प्रीतिलता वडडे्दार – ब्रिटिश अधिकार्‍यांच्या क्लबवर गोळीबार
  • शांती घोष चौधरी – कोमिल्लाच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटची हत्या
  • बीना दास – कलकत्ता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात गर्व्हनरवर गोळया झाडल्या

 

 

Subject English Summary: The important information in the competitive exams is the revolutionary movement in India. If you have detailed information on this topic, it will be easier to answer the related questions. For this, if you are sincerely preparing for the competitive exams, then you must know and remember the details about the revolutionary movement in India.

Subject English Searching Title: Bharatatil Krantikari Chalavali study of competitive exams in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x