GK - भारतातील सामाजिक सुधारणांविषयक कायदे
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे भारतातील सामाजिक सुधारणांविषयक कायदे. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर भारतातील सामाजिक सुधारणांविषयक कायद्यांबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
भारतातील सामाजिक सुधारणांविषयक कायदे
सतीबंदी:
- 1829 सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.
- ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.
- नंतर पुराण ग्रंथात सती प्रिथेला महत्व प्राप्त झाले.
- पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.
- काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.
- ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.
- ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.
- काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्डमिंटो, लॉर्ड हेस्टिग्ज, व अॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले.
- काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा लॉर्ड वेलस्लीने सुरु केले.
- सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने लॉर्ड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या.
ठगांचा बंदोबस्त:
- ठग हे कालीमातेचे उपासक होते.
- लुटीचा व्यवसाय व गंगा नदीत नावाडी म्हणून काम करत असे.
- विजयादशमीच्या मूहुर्तावर ठग व्यवसायासाठी घरातून बाहेर पडत होते.
- नवीन व्यक्तीला टोळीत समाविष्ट करताना एक विधी केला जाई. देवीची प्रार्थना केली जाई.
- उजव्या हातावर रुमाल आणि धंद्याची खूण म्हणून कुर्हाड ठेवण्यास येई. प्रवासाला ज्या ठिकाणी ठार मारत त्या ठिकाणास भीळ म्हणत भीळ जवळ आले कह भरोरी रुमाल टाकून खून करणारे प्रवाशंच्या मागे उभे राहात. जयकाली तमाकू लाव असे म्हणत त्यास ठार मारत. त्याचे प्रेत फुगुन वर येऊ नये म्हणून त्याच्या पोटात खुेटी मारत व पुरत असत.
- या ठगांनी माळवा, मध्य प्रदेश, गंगा नदी, हैद्राबाद येथे धुमाकुळ घातला होता.
- लॉर्ड बेटिंकने हैद्राबादचा निजाम अयोध्येचा वजीर यांची मदत घेऊन कर्नल स्लीमन यांची ठगाच्य बंदोबस्तासाठी नियुक्ती केली.
त्याने 3200 ठग पकडले. 1500 ना फाशी दिली. काहींना पुनर्वसन करण्यासाठी जबलपुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन केली.
बालहत्या प्रतिबंधक कायदा:
- ज्या कुटुंबाला संतती होत नसे, ते गंगेला नवस करत असत की आपणाला संतती झाल्यास त्यापैकी काही गंगेत सोडू मूल झाल्यावर गंगेला फेकून दिले जाई.
- ही प्रथा लॉर्ड वेलस्लीने 1802 मध्ये कायदा करुन बंद केली. तसेच ओरिसामध्ये मागासलेल्या खेडयात हतू नावाच्या देवतेसमोर लहान मुलांचा बळी दिला जाई.
मध्ये प्रदेश राज्स्थान, पंजाब,काठेवाड, या प्रदेशात जन्मत:च मुलींना ठार मारले जाई. - तिचा श्वास कोंडून तिला अफु देऊन तिचे दुध बंद करुन तिचा शेवट केला जाई. कारण मुलीला योग्य वर मिळत नसे किंवा तिच्या लग्नाला खर्चही परवडत नसे हा प्रकार थांबविण्यासाठी 1795 मध्ये कंपनीने कायदा करुन बालहत्या करणे म्हणजे खून करण्यासारखे आहे असे जाहीर केले.
- 1804 मध्ये कायद्याची प्रादेशिक व्याप्ती वाढविली लॉर्ड बेंटिंकने विल्किन्स याची नियुक्ती करुन ही प्रथा बंद केली.
- 1870 मध्ये मुलाच्या जन्माची नोंद करणे जिवंत आहे किंवा नाही याची खात्री करुन घेण्याची पध्दत सुरु केली.
धार्मिक आत्महत्या प्रतिबंधक कायदा:
- कंपनी काळात हिंदुस्थानात धर्माच्या नावावर आत्महत्या करण्याचे प्रकार होते.
- त्यामध्ये मध्ये प्रांतीतील लोकाचा असा समज होती, की देवस्थाननजिकच्या कडयावरुन कडेलोट केल्यास मोक्ष मिळतो अनेक यात्रेकरू कडेलोट करत असत ते कायद्याने बंद केले.
- गंगेकाठी मरण आल्यास मोक्ष प्राप्त होतो. असा समज असल्याने अनेक मरणोन्मुख लोक गंगेकाठी येऊन पडत असत. ते कायद्याने बंद केले.
- बिहार, ओरिसा, प्रांतामध्ये खोंड नावाची जमात होती, ते दैवतास संतुष्ट करण्यासाठी मनुष्याचा बळी देत असत. ते लोक जमिनीत भरपूर उत्पादन मिळावे म्हणूनही नरबळी देत असे. ते कायद्याने बंद केले ही प्रथा चालू असल्याने 1845 मध्ये नरबळीऐवजी रेडे मारण्याची परवानगी दिली.
- हिंदू कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर वडिलांच्या संपत्तीचा हक्क रद्द होत असे लॉर्ड बेटिंकने या सुधारणा करुन ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्याक्तीला त्याच्या वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार देऊ केला.
गुलामाच्या व्यापारास विरोध:
- भारतात गुलामगिरीची पध्दत प्रचलित होती. उत्तर भारतामध्ये घरकामासाठी, वेश्या व्यवसायासाठी गूलाम ठेवण्याची प्रथा होती.
- दक्षिण भारतात शेतकामासाठी गुलाम बाळगत असत. वॉरन हॅस्टिंग्सच्या काळात दरोडेखोरांच्या मुलांना स्त्रियांना गूलाम करावे असा आदेश काढला होता.
- ब्रिटिश अधिकारी व्यापारी, श्रीमंत लोक आपली विषयवासना तृप्त करण्यासाठी स्त्रियांना गुलाम म्हणून विकत घेत असत.
- 19 व्या शतकाच्या प्रारंभी 16 रु. पर्यत मुलगा व 150 रु पुरुष आणि 100 ते 1000 रु. पर्यत मुली व स्त्रियांची गुलाम म्हणुन विक्रि होत असत.
लॉर्ड कॉर्नवॉलिसने:
- 1789 मध्ये देशाबाहेर गुलामांना पाठविण्यास बंदी घातली.
- 1807 मध्ये गुलामगिरी बंद करण्याचा कायदा केला.
- 1811 मध्ये कायदा करुन भारताबाहेरुन गुलाम आणण्यास बंदी घातली.
- 1832 मध्ये कायदा करुन जिल्हयाबाहेर गुलाम पाठवण्यिास बंदी घातली.
- 1843 मध्ये कायद्याने गुलामगिरी नष्ट केली तर 1860 मध्ये गुलामगिरीविरुध्द कायद्याचा इंडियन पिनलकोडमध्ये समावेश केला.
- खानदेश वर्हाड स्त्रियांना पळवून नेऊन त्यांचा व्यापार करणार्या टोळया होत्या. त्यांचा बेटिंकने बंदोबस्त केला.
पुनर्विवाहाचा कायदा:
हिंदु
- धर्माने स्त्रीयांना पुरुषांबरोबर स्थान दिले होते. परंतु नंतरच्या काळात पत्नीस दुय्यम दर्जा देण्यात आला.
- पुरुषांना अनेक विवाह करण्यास धर्मशास्त्राचा विरोध नव्हता बालविवाह झाल्यानंतर प्रौढत्व प्राप्त होण्यापूर्वी एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिला विधवा म्हणून खडतर जीवन जगावे लागत असे.
- सुरुवातीस पुनर्विवाहास धर्माची मान्यता होती. परंतु नंतरच्या काळात बंद झाली. पुनर्विवाहापासून प्राप्त झालेली संतती बेकायदेशीर ठरविण्यात येई.
- राजा राममोहन रॉय यांनी पुनर्विवाहास मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले.
- ब्राहो समाजाच्या स्थापनेनंतर ही चळवळ सुरु केली.
- पंडित ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी शास्त्राच्या आधारे सिध्द केले की, हिंदुधर्मशास्त्रांनी पुनर्विवाहास मान्यता दिली. आहे. त्यांनी पुनर्विवाहास मान्यतेसाठी 1 हजार लोकांच्या सहयांचे निवेदन पाठविले.
- धर्ममार्तडांनी 37,000 लोकांच्या सहयाने निवेदन पाठवून पुनर्विवाहास मान्यता देऊ नये असे कळवले लॉर्ड डलहौसीच्या काळात इ.स. मध्ये पुनर्विवाहाचा कायदा मुजूर करण्यात आला.
- या कायद्यानुसार पुनर्विवाहास व त्यांच्यापासून झालेलया संततीला मान्यता देण्यात आली.
- बंगालमध्ये पंडित ईश्र्वरचंद्र विद्यासागर महाराष्ट्र्र महर्षी कर्वे, तसेच वीरेसलिंगम पुतलु यांनी पुनर्विवाह कायद्यासंदर्भात मौलिक कार्य केले.
Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, ias online classes, learning app, Current Affairs, current affairs quiz, gktoday, gk today, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.
Subject English Searching Title: Bharatatil samajik sudharananvishayak kayade study for competitive exams current affairs quiz and current affairs in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL