GK - नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर नवीन धार्मिक प्रवाहाबद्दलची सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती:
जैन धर्माचा उदय :
- उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञयागाच्या कर्मकांडामध्ये पूरोहित लोकांचे वर्चस्व वाढले आणि ज्ञानदानाचे हक्क मोजक्या लोकांच्या हातात आले.
- जातीव्यवस्था कठीण होत जावून उच्च-नीच्च भेदभाव सुरू झाला.
- व्यक्तीचा दर्जा हा कर्तव्यावर नसून जन्मावर असल्याची संकल्पना रूढ झाली. या कारणामुळे समाजव्यवस्थेतील बहुतांशी वर्ग हा ज्ञानापासून दूर ढकलला गेला.
- या वर्गाला अंधकारातून वर काढण्याचा पहिला प्रयत्न जैन धर्माने केला.
भगवान वर्धमान महावीर (इ.स.पूर्व 599 ते 527)
- भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर असून, त्याचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे झाला.
- त्यांनी सर्व इंद्रियांवर ताबा मिळविला म्हणून त्यांना लोक जिन म्हणू लागले. ते स्थानिक अर्धमाधवी भाषेमध्ये धर्मप्रचार करू लागले.
- महावीरांना जातीभेदभाव मान्य नव्हता. यामुळे धर्मज्ञानापासुन दूर राहिलेले लोक त्याच्याकडे आकृष्ट होवून त्यांचे अनुयायी झाले.
जैन धर्माची शिकवण:
- पंचमहाव्रते (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) आणि त्रिरत्न (सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र) ही भगवान माहावीराच्या प्रवचनाची मुख्य तत्वे होती.
- या सर्वामध्ये त्यांनी अहिंसेला सर्वात जास्त महत्व दिले.
- आपले सर्व आयुष्य महावीरांनी सामान्य जनतेला उपदेश करण्यात घालविले त्याचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी पावापुरी येथे निधन झाले.
गौतम बुद्ध (इ.स.पूर्व 533 ते 483)
- बहुजन समाजाला यज्ञयागाच्या कर्मकांडापासून दूर नेणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्माची स्थापना भगवान गौतम बुद्धाने केली.
- भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ आहे. त्यांचा जन्म आजच्या नेपाळमध्ये असलेल्या लुंबिनी येथील राजघराण्यात झाला.
- संसारातील दुख:बघून त्यांनी राजघराण्याचा त्याग केला आणि ज्ञान प्राप्तीकरिता बाहेर पडले.
- बिहारमधील गया या ठिकाणी एका बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखल्या जावू लागले.
धम्मचक्रप्रवर्तन:
- ज्ञान प्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. त्यांचे हे प्रवचन धम्मचक्रप्रवर्तन म्हणून ओळखले जाते.
- आपला उपदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा म्हणून त्यांना सामान्य लोकांना समजेल अशा पाली भाषेमध्ये प्रवचन दिले.
- सोपी भाषा आणि कर्मकांडाचा व जातीभेत नसल्यामुळे बहुजन समाज गौतम बुद्धाकडे आकर्षिला गेला.
बौद्ध धर्माची शिकवण:
- गौतम बूद्धांनी निर्मानाच्या प्राप्तीकरिता अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम आणि मादक पदार्थाचे सेवन करू नयेत या पंचशिलाचे पालन करण्यास संगितले.
- गौतम बूद्धांनी दुख: निवारण्याकरिता अष्टांग मार्गाचे महत्व सांगितले.
बौद्ध संघ:
- जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला उपदेश पोहचावा म्हणून गौतम बूद्धांनी बौद्ध संघाची स्थापना केली. त्यांनी आपल्या बौद्ध संघामध्ये महिलांनाही सहभागी करून घेतले. यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
- बहुजन समाजाच्या हिताकरिता आयुष्य खर्च करणार्या या महान व्यक्तीचे इसनपूर्व 483 मध्ये निर्वाण झाले.
News English Summary: Important information in the competition exams is information about the new religious stream. If you have detailed information on this topic, it will be easier to answer the related questions. For that, if you are sincerely preparing for the competitive exams, be sure to know and remember the details of the new religious stream.
News English Searching Title: Navin dharmik pravahabaddal mahiti study for competitive exams in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL