16 November 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

GK - राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना:

  • इंग्रज अधिकारी सर ऍलन ह्युम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. या संघटनेची पहिली बैठक डिसेंबर 1885 मुंबई येथे बोलाविण्यात आली.
  • राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी गवालिया टॅंक जवळील गोकूळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले होते.
  • कलकत्याचे प्रसिद्ध वकील ओमेशचंद्र बॅनर्जी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
  • या अधिवेशनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून एकूण 72 प्रतीनिधी हजर होते.

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने त्याचे वैशिष्टे:

  • 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन
  • 1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी
  • 1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष
  • 1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष
  • 1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष
  • 1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.
  • 1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.
  • 1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.
  • 1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.
  • 1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.
  • 1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.
  • 1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.
  • 1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
  • 1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.
  • 1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
  • 1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.
  • 1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.
  • 1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.
  • 1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
  • 1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.
  • 1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.
  • 1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –
  • 1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –
  • 1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.
  • 1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.
  • 1946 – मिरत – जे. बी. कृपालानी
  • 1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

 

Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.

Subject English Searching Title: Rashtriya Congress chi Sthapana study for competitive exams in Marathi.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x