5 November 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

ट्रम्प यांना Google चाही दणका | YouTube अकाऊंट केलं बंद

Youtube, Google, Donald Trump Channel

मुंबई, १३ जानेवारी: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला होता. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले होते. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला होता.

हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांचं अकाउंट सस्पेंड केल्याचं कारण ट्विटरने दिलं आहे. हिंसाचाराला उद्युक्त करण्याच्या जोखमीमुळे आम्ही त्याचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं आहे. ट्विटर नियमांचं उल्लंघन केल्यानं हे पाऊल उचलल्याचं, ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

त्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे.

 

News English Summary: Google, owned by Google, one of the world’s leading information technology companies, on Wednesday temporarily banned US President Donald Trump’s account. The video, which was uploaded to Trump’s channel, was used by YouTube to promote violence.

News English Title: Youtube removes new content uploaded on Donald Trump Channel news updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x