23 December 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

रूपाणींचा प्रचार | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात

Gujarat Chief minister Vijay Rupani,  criticizes Maharashtra government, Gujarat by poll election

लिंबडी, २८ ऑक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टीकेचे धनी केले. ते गुजरातेतील लिंबडी विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ‘भगवान भरोसे’ असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

“आम्ही गुजरातेत कोरोना परिस्थिती आटोक्यात ठेवली. बाजूचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात कोरोनामुळे ४५ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये कोरोना बेड्स उपलब्ध नाहीत, तिकडे रुग्ण रस्त्यावर हिंडतात. कोरोनाबाधितांचे मृतदेह महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात.” असा आरोप रूपाणी यांनी केला.

यावेळी त्यांनी गुजरातेतील कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार यशस्वी ठरल्याचा दावा करताना, “राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा बेड्सची संख्या अधिक आहे, इथं कोरोना बेड्सचा कसलाच तुटवडा नाही. आपल्याकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के तर मृत्यूंचे प्रमाण केवळ २.२५ टक्के एवढं आहे. मृतांची टक्केवारी अजूनही खाली पडत आहे. राज्यात कोरोनावरील महागडी इंजेक्शन्स आणि औषध मोफत देण्यात आली आहेत.” असं वक्तव्य केलं. “राज्यात भाजप सरकार असणं गुजराती लोकांसाठी भाग्यकारक ठरलं आहे. इथे जर काँग्रेसची सत्ता असती तर महासाथीमध्ये सर्वत्र सावळा गोंधळ उडाला असता.” असंही रूपाणी म्हणाले.

वास्तविक गुजरातच्या अहमदाबादमधील रुग्णालयातील अवस्था अतिशय दयनीय असून, ती कोणा एका अंधारकोठडीपेक्षा वेगळी नाही किंबहुना परिस्थिती त्याहूनही वाईट आहे या शब्दांत उच्च न्यायालयानं राज्य शासनाचा खरपुस समाचार घेतला होता. न्यायमूर्ती जे.पी. परडीवाला आणि आय.जे वोरा यांच्या खंडपीठानं मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या नेतृत्त्वाखालील सरकारला याविषयीचे खडे बोल सुनवत परिस्थिती अत्यंत वाईट आणि वेदनादायी असल्याचं मत मांडलं होतं. सिव्हिल रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणं अपेक्षित असतं. पण, इथे मात्र परिस्थिती ही एखाद्या अंधारकोठडी किंवा त्याहूनही वाईट स्तरावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. दुर्दैवानं गरिब आणि निराधारांकडे कोणताही पर्याय नसल्यामुळं त्यांना यावरच अवलंबून राहावं लागतं, असा सूर न्यायालयाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात आळवण्यात आला होता.

दरम्यान सुनावणी करतेवेळी न्यायालयाकडून राज्यातील परिस्थितीची तुलना ही बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित न्यायाधीशांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

तसेच गुजरात सरकारच्या कोरोना संकट हाताळणीमध्ये प्रचंड दोष होते. गुजरात सरकारने स्वतःच न्यायालयासमोर अहमदाबादमध्ये कोरोना चाचण्या करत नसल्याचे कारण देत असताना चाचण्या केल्यास अहमदाबदची ७० टक्के जनता कोरोना पॉझीटीव्ह निघेल असे मान्य केले. अहमदाबादची लोकसंख्या पाहता किमान ४० लाख लोकसंख्या ही कोरोना पॉझिव्हिट निघेल असे गुजरात सरकारचेच म्हणणे आहे. याच पठडीमध्ये अहमदाबादचे महानगरपालिक आयुक्त विजय नेहरा यांनी मे महिन्यात किमान ८ लाख कोरोना पॉझिटीव्ह निघतील असे सांगितले होते. या वक्तव्यानंतर गुजरात सरकारने त्यांचीही तडकाफडकी बदली केली होती.

 

News English Summary: Targeting the Congress, Gujarat chief minister Vijay Rupani alleged that the party’s government in Maharashtra is “bhagwan bharose” (at god’s mercy) when it comes to controlling the coronavirus situation, unlike his state. He also alleged that there was no arrangement of beds in hospitals for COVID-19 treatment in Maharashtra and bodies of patients who die due to the infection lie on footpaths unattended. The Congress is part of the Shiv Sena-led Maha Vikas Aghadi (MVA) government in Maharashtra with NCP as the other partner.

News English Title: Gujarat Chief minister Vijay Rupani criticizes Maharashtra government during Gujarat by poll election rally News updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x