22 December 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

गुजरातमध्ये मृत्यू सहापट कमी दाखवले जात आहेत | स्मशानभूमीतील पेपर स्लिपवर मृत्यूचे कारण दिलं जातं नाही - सविस्तर

Gujarat corona pandemic

गांधीनगर, २६ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण व मृतांच्या संख्येत दररोज सतत वाढच होत आहे. रविवारी कोरोनाचे सुमारे साडेतीन लाख नवे रुग्ण आढळून आले तर २७६७ जणांचा बळी गेला. सध्या देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६ लाखांहून अधिक असून १ कोटी ४० लाख लोक या संसर्गातून बरे झाले.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये सलग चौथ्या दिवशी तीन लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी कोरोना आजारातून २ लाख १७ हजार जण बरे झाले आहेत. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत. मृतांची प्रत्यक्षातील संख्या सरकारी आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे.

सध्या जगातील जवळपास निम्मे रुग्ण भारतात आढळत आहेत. तज्ञांच्या मते, संसर्गाचे खरे चित्र समोर आणले जात नाही. दरम्यान, काही समीक्षकांच्या मते, खरी संख्या लपवण्यासाठी राज्य सरकारांवर केंद्राचा दबाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केलं आहे. त्यासाठी थेट अहमदाबादमधून ग्राउंड रिपोर्ट घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील सविस्तर वृत्तात दिव्य मराठीने वृत्तपत्राने म्हटलं आहे की, “अहमदाबादमध्ये एका स्मशानभूमीत चोवीस तास चिता ज‌ळत आहेत. तेथे काम करणारे सुरेशभाई यांनी सांगितले की, आम्ही मृतांच्या नातेवाइकांना ज्या पेपर स्लिप देतो त्यात मृत्यूचे कारण लिहीत नाही. अधिकाऱ्यांनीच तसे निर्देश दिले आहेत. भारताच्या स्थितीवर लक्ष ठेवून असलेले मिशिगन विद्यापीठाचे महामारी तज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, आम्ही जेवढे मॉडेल बनवले आहेत त्याच्या आधारे आम्ही खात्रीने सांगू शकतो की, मृतांची जेवढी संख्या दाखवली जात आहे त्यापेक्षा दोन ते पाचपट जास्त मृत्यू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताची स्थिती चांगली होती.

वाईट दिवस संपले आहेत असा विचार करून अधिकारी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगणे सोडून दिले. आता असंख्य भारतीय सोशल मीडियावर रुग्णालय, बेड, औषधे, ऑक्सिजन मिळावा यासाठी हृदयविदारक मेसेज करत आहेत. वृत्तपत्रांत राष्ट्रीय आणीबाणीसारखे मथळे येत आहेत. देशभरात सामूहिक अंत्यसंस्कार होत आहेत. अनेक चिता एकाच वेळी पेटल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, भारताची लसीकरण मोहीम थंडावली आहे. जगातील प्रमुख लस उत्पादक देश असूनही आतापर्यंत फक्त १० टक्के भारतीयांचेच लसीकरण झाले आहे.

गुजरातेत मृत्यू सहापट कमी दाखवले;
वायूगळती दुर्घटना अनुभवलेल्या भोपाळचे लोक सांगतात, त्या दुर्घटनेनंतर प्रथमच स्मशानांत गर्दी दिसत आहे. एप्रिलच्या मध्यात अधिकाऱ्यांनी कोरोनाचे मृत्यू ४१ सांगितले. मात्र, कब्रस्तान आणि स्मशानांच्या सर्व्हेत या काळात १ हजारावर अंत्यसंस्कार कोविड प्रोटोकॉलनुसार झाल्याचे दिसून आले. हीच स्थिती गुजरात आणि उत्तर प्रदेशातील आहे. गुजरातमध्ये या काळात सरासरी ६१० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते.

 

News English Summary: At present, almost half of the world’s patients are found in India. According to experts, the true picture of the infection is not presented. Meanwhile, according to some critics, the Center is putting pressure on state governments to hide the real numbers. Divya Marathi has published detailed news about this. For this, a ground report has been taken directly from Ahmedabad.

News English Title: Corona death number are not real in Gujarat said gound report of media news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x