महाराष्ट्रावर कोरोना रुग्ण संख्येवरून आरोप | पण गुजरातमध्येच होतोय कोरोना घोटाळा

गांधीनगर, २ नोव्हेंबर: गुजरातचे मुख्यमंत्री गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राला कोरोना स्थितीवरून लक्ष करत होते. गुजरातमध्ये प्रचारत मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले होते की महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला कोरोना रुग्णांचे मृतदेह सापडतात. गुजरातमध्ये भाजपने कोरोना नियंत्रणात ठेवला, पण महाराष्ट्रात कोरोनामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे असं मुख्यमंत्री थेट प्रचारातच म्हणाले होते.
मात्र गुजरातमध्ये कोरोना कसा नियंत्रणात आणला या मागील वास्तव सध्या समोर येऊ लागलं आहे. कारण गुजरातच्या राजकोट आणि जामनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असले तरी देखील ते निगेटिव्ह दाखविण्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचं वृत्त आहे. गुजरात राज्य सरकारमधील आरोग्य विभागाचे अधिकारीच यात सामील असून त्यांनी पॉझिटिव्ह मोठ्या प्रमाणावर रुग्णांना निगेटिव्ह दाखविण्याची धमकी कर्मचाऱ्यांना दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Thyrocare Lab’च्या सीईओंनीच गुजरात सरकारांवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारांची बदनामी होईल या भीतीने कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी लपविण्याचे कृत्य करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअर (Thyrocare) ने केले होते. याबाबत Thyrocare Technologies चे सीईओ वेलुमनी यांनी स्पष्ट सांगितले की, काही राज्यांनी थायरोकेअरला सूचना दिल्या आहेत की, कोरोनाच्या चाचण्या घेऊ नका. तर काही राज्यांनी कोरोना रुग्णांचे आकडे आयसीएमआरला देऊ नयेत किंवा त्यामध्ये हेराफेरी करावी, असे सांगितले आहे. गुजरातमधील हेराफेरीचे अधिकृत वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केलं आहे.
विशेष म्हणजे राजकोट आणि जामनगर भागातील रॅपिड अँटिजन किटद्वारे केलेले एकूण तीन लाख ५० हजार रेकॉर्ड तपासण्यात आली. यापैकी अनेक रुग्णांशी थेट फोनवर संपर्क साधून काही प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर सर्व धक्कादायक षडयंत्राच माध्यमांच्या समोर आलं आहे. राजकोट मनपा, राजकोटमधील गावे आणि जामनगर या ३ भागातील कोरोना पेशंटचे आकडे कमी दाखविण्यासाठी वेगवेगळे प्रकारच्या कुरापत्या करण्यात आल्या असं चौकशीत पुढे आलं आहे. महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये पालिका आयुक्तांपासून आरोग्य खात्याचे महत्वाचे आणि वरिष्ठ पदावरील मोठमोठे अधिकारी थेट सहभागी असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
दैनिक भास्करच्या सविस्तर वृत्तानुसार जिल्हा आरोग्य कचेरीच्या Email ID वरून जामनगरच्या सर्व हॉस्पिटल अधिकाऱ्यांना mail करण्यात आला होता. या मेलला अटॅच लिस्टसारखी अँटीजेन निगेटीव्हची नोंद करायची आहे. चुकूनही पॉझिटिव्ह म्हणून कोणाची नोंद होता नये असे थेट डिजिटल आदेश देण्यात आले होते. मेलमध्ये पाठविणाऱ्याचे नाव डॉ. बीपी मणवर असे लिहिण्यात आले होते. यामध्ये ९०० कोरोना रुग्णांचे नाव होते. राजकोट जिल्ह्यात तर तब्बल ५३२५ पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३७२० दाखवला असं वृत्तामध्ये म्हटलं आहे.
News English Summary: The real reality behind how Corona was brought under control in Gujarat is now coming to the fore. This is because in Rajkot and Jamnagar in Gujarat, even though the reports of a large number of corona patients are positive to show less corona patients, there is a shocking trend of showing negative corona. According to Dainik Bhaskar, only the officials of the health department in the Gujarat state government are involved in this and they have threatened the employees to show a large number of positive patients.
News English Title: Corona scam Prime Minister Narendra Modis state report came positive register negative News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON