23 December 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

गुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी

Gujarat health Emergency

गांधीनगर, १२ एप्रिल: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.

रविवारी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली आहे.

मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी उच्च न्यायालयातील रेजिस्ट्रीला तोंडी आदेशा देत जनहित याचिका दाखल करून घेताना ‘कोविड कंट्रोलमधील गंभीर व्यवस्थापन विषय’ या शीर्षकाखाली नव्याने नोंदणी करण्याची सूचना केली आहे. कोरोनव्हायरस परिस्थितीबद्दल गुजरात उच्च न्यायालयाने नोंदविलेली ही दुसरी पीआयएल आहे. सोमवारी (आज १२ एप्रिल)’ला जनहित याचिकेची सुनावणी न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या निवासस्थानी आणि न्यायमूर्ती भार्गव डी करिया यांच्या खंडपीठामार्फत ऑनलाईन पद्धतीने होईल.

 

News English Summary: The Gujarat High Court on Sunday initiated a suo motu PIL over the coronavirus situation in the state, observing that media reports on the pandemic indicate that the state was heading towards a “health emergency of sorts”.

News English Title: Gujarat state high court to hear SUO Motu PIL on Covid 19 health emergency in state today news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x