22 October 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, फायदा घ्या - GMP IPO Reliance Share Price | कमाईची मोठी संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज सहीत हे 10 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRB Shraddha Kapoor Entry In Pushpa 2 | श्रद्धाची पुष्पा 2 मध्ये एन्ट्री, स्त्री 2 नंतर गाजवणार 'पुष्पा 2', बॉक्स ऑफिसवर धमाल Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News ICICI Mutual Fund | जबरदस्त फायद्याचा फंड, SIP बचतीवर मिळेल 52.46 टक्केपर्यंत परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

गुजरातच्या फेक विकासाची पावसामुळे पोलखोल | राज्यात राज्य महामार्गांसह 103 रस्ते बंद ठेवण्याची नामुष्की

Gujarat Rain

गांधीनगर, २४ सप्टेंबर | सौराष्ट्र, कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागासह गुजरातच्या अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की देशातील काही पश्चिम राज्यात पुढील ४ दिवस पाऊस अजून पडणार आहे.

गुजरातच्या फेक विकासाची पावसामुळे पोलखोल, राज्यात राज्य महामार्गांसह 103 रस्ते बंद ठेवण्याची नामुष्की – Heavy rain in many parts of Gujarat total 103 roads closed due to rain forecast :

गुजरात राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या (एसईओसी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने आणि रस्त्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे दोन राज्य महामार्गांसह 103 रस्ते राज्याच्या विविध भागात बंद करण्यात आले आहेत.

हवामान खात्याने आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र प्रदेशात, विशेषत: जामनगर, देवभूमी-द्वारका, अमरेली आणि भावंजर जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

एसईओसीने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, आज दिवसभरात जामनगर, कच्छ, नवसारी, सुरत आणि वलाड जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. आज सकाळी 6 ते संध्याकाळी 4 दरम्यान जामनगर जिल्ह्यातील जोडीया तालुक्यात सर्वाधिक 188 मिमी पाऊस झाला आहे.

आकडेवारीनुसार, कच्छमधील नखतरानामध्ये 93 मिमी, नवसारीच्या गंडावी 81 मिमी, चिखली 77 मिमी, सुरतचे उमरपाडा 73 मिमी, वलसाडचे कपर्दा 69 मिमी आणि कच्छचे अंजार 66 मिमी पाऊस झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Heavy rain in many parts of Gujarat total 103 roads closed due to rain forecast.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x