लॉकडाउनमुळे लोकांकडे खूप वेळ | म्हणून जाहिरातीवर मूर्खपणाची प्रतिक्रिया देऊन ट्रोलिंग

गांधीनगर, १४ ऑक्टोबर : दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
“ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो” असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटले आहे. गुजरातच्या गांधीधामधमली ‘तनिष्क’च्या शोरूमवर हा हल्ला करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
या जाहीरातीवरून वाद झाल्याने मंगळवारीच कंपनीने ही जाहीरात मागे घेतली हिती. या जाहीरातीत दोन वेगळ्या धर्मांचे कुटुंबीय दाखवण्यात आले होते. ही जाहीरात ही ‘लव्ह जिहाद’ला आणि बेगडी धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देणारी आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावरूनही त्या विरुद्ध कॅम्पेन चालवलं गेलं.
नंतर तनिष्क ने निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली होती. आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. या जाहीरातीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही खेद व्यक्त करतो असंही कंपनीने म्हटलं होतं. टाटांचा मोठा ब्रँड असलेल्या तनिष्कने दागिण्यांचा संग्रह ‘एकत्वम’साठी ही जाहीरात केली होती.
दरम्यान, तनिष्कच्या त्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं परखड मत अॅडगुरु भरत दाभोळकर यांनी व्यक्त केलं आहे. तनिष्कने जी जाहिरात केली आहे ती गेल्या दशकांमधल्या ज्या चांगल्या जाहिराती आहेत त्यापैकी एक जाहिरात आहे.या विरोधात काहीही प्रोटेस्ट होणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ‘मी ही जाहिरात केली असती तर समाधानी असतो’ असं ही जाहिरात विश्वात एक प्रतिक्रिया दिली जाते. तशीच प्रतिक्रिया मला तनिष्कच्या या जाहिरातीबाबत द्यावीशी वाटते की मी ही जाहिरात केली असती तर आनंद झाला असता. लोकांना लॉकडाउनमध्ये खूप वेळ आहे.. त्यामुळे मूर्खपणाची एक प्रतिक्रिया देऊन ही जाहिरात ट्रोल होते आहे. ही बाबत अत्यंत चुकीची आहे यामध्ये लव्ह जिहाद असं काहीही नाही. मुस्लिम कुटुंबातली सासू हिंदू सुनेचं कौतुक करते आहे यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे? असाही प्रश्न भरत दाभोळकर यांनी विचारला आहे.
News English Summary: The showroom of Tanishq, a popular jewelery brand, has come under attack in Gujarat. There is a big controversy over Tanishq’s advertisement which conveys the message of Hindu-Muslim unity. Due to the large number of trolls on social media, Tanishq had to withdraw the advertisement. The manager of the Tanishq showroom in Gujarat had to write an apology to the crowd. This was reported by NDTV.
News English Title: It Is Foolish To Call Tanishq Advertisement Love Jihad Says Bharat Dabholkar News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB