24 November 2024 10:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

गुजरात | एक एक फुटावर २५ अंत्यविधी | शवदाहिन्या अक्षरश: २४ तास सुरू

Corona pandemic

अहमदाबाद, १५ एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं पसरत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर असल्याचं चित्र आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही, अशी भीषण दृश्यं सध्या दिसू लागली आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. त्यामुळे शवदाहिन्या अक्षरश: २४ तास सुरू आहेत.

सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी २५ जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अहमदाबादमधल्या काही मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी तब्बल ८ तास वाट पाहावी लागली. शहरात वाडाज आणि दुधेश्वर या दोन प्रमुख स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संपुर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे. भारतातही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यावरूनच सामना अग्रलेखातून भाजपला सुनावले आहे. तसेच हरिद्वार येथे जो कुंभमेळा झाला त्यावरून देखील भाजपला खडे बोल सुनावले आहेत. तसेच, अजूनही लोकं ऐकत नसून नागरिकांना सामना अग्रलेखातून गुजरात मधील स्थितीचे उदाहरण देखील देण्यात आले आहे.

कोरोनासंदर्भातली आणीबाणी फक्त महाराष्ट्रातच उद्भवली आहे काय? संपूर्ण देशच कोरोनाच्या जबडय़ात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला नाही. हरिद्वारच्या कुंभमेळय़ाने कोरोनाचा अणुबॉम्बच फोडला.

कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संत आणि गंगेत डुबकी मारणाऱ्या पवित्र आत्म्यांना कोरोना झाला आहे. आता हे लोण पसरत जाईल असं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं आहे. देशभरात कोरोना धुमाकूळ घालीत असताना धर्म, सण, उत्सव यावर नियंत्रण ठेवावेच लागेल असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

 

News English Summary: Gujarat is witnessing the devastation of Corona. Relatives of the deceased have to wait for the funeral outside many cemeteries. The situation is critical in major cities like Ahmedabad and Surat. Hinduism generally does not perform funeral rites after sunrise. However, as the death toll in Corona continues to rise, funerals are being held at night in many places. Therefore, cremation is going on literally 24 hours.

News English Title: The situation is critical in major cities like Ahmedabad and Surat due to corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x