28 January 2025 8:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

लसीकरण | देशात २१ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले | 2 कोटीचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र एकमेव राज्य

India corona pandemic

नवी दिल्ली, ३० मे | देशात लसीकरण सुरू होऊन 134 दिवस झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 18 ते 44 वयोगटातील 14.15 लाख लोकांना पहिला आणि 9,075 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यापासून 1.82 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र देशातील एकमेवर राज्य आहे, जिथे 2 कोटींपेक्षा जास्त (2.20) लसीकरण झाले आहे. याशिवाय, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये एक कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बिहार, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशने 18 ते 44 वयोगटातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना पहिला डोस दिला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 21.18 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 98.61 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर 67.71 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे.

याशिवाय, 15.55 कोटी फ्रंटलाइन वर्करला पहिला आणि 84.87 लाखांना दुसरा डोस मिळाला आहे. यात 18-44 वयोगटातील 1.18 कोटींना पहिला आणि 9,373 दुसरा डोस मिळाला आहे. 134व्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 28.09 लाख डोस देण्यात आले. यात 25.11 लाखांनी पहिला आणि 2.98 लाखांनी दुसरा डोस घेतला.

 

News English Summary: It has been 134 days since vaccination started in the country. The Union Health Ministry said on Saturday that 21 crore people have been vaccinated in the country so far. Of these, 14.15 lakh people between the ages of 18 and 44 received the first dose and 9,075 received the second dose. Since the start of the third phase of vaccination, 1.82 crore citizens have been given the first dose.

News English Title: 21 crore doses of corona vaccine have been applied in the country Maharashtra on top news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x