Health First | डार्क सर्कलने आहात त्रस्त | मग बदामाच्या तेलाचा या 4 पद्धतीने करा वापर

मुंबई, १५ सप्टेंबर | आजकाल डोळ्यांखालील डार्क सर्कलच्या समस्येचा सर्वच जण सामना करत आहेत. आपली बदललेली जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. बराच वेळ कम्प्युटरसमोर बसून काम करणे, मोबाईलचा अतिवापर यामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. डार्क सर्कल कमी करण्यासाठी बऱ्याच क्रिमचा वापर केला जातो पण त्याचा कधी कधी काही फायदा होत नाही. अशामध्ये तुम्ही घरगुती उपाय करुन हे डार्क सर्कल कमी करु शकतात. डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदामाचे तेल खूपच फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदामाच्या तेलाचा कशा पद्धतीने वापर करायचा हे सांगणार आहोत..
डार्क सर्कलने आहात त्रस्त, मग बदामाच्या तेलाचा या 4 पद्धतीने करा वापर – Almond oil is beneficial on dark circles :
बदाम तेल आणि गुलाब पाणी – Almond oil and rose water :
गुलाब पाण्यात कापूस भिजवून तो डोळ्यांखाली लावा. हा कापूस कोरडा होऊ द्या. त्यानंतर प्रभावित त्वचेवर बदामाच्या तेलाचे काही थेंब लावा आणि काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. रात्रभर तेल असेच राहू द्या.
बदाम तेल आणि एवोकाडो – Almond oil and avocado :
पिकलेल्या एवोकाडोचे 2-3 काप मॅश करा आणि त्यात 6-8 थेंब बदामाचे तेल टाका. व्यवस्थित मिक्स करुन दोघांची चांगली पेस्ट तयार करुन घ्या. ही पोस्ट डोळ्यांभोवती काळजीपूर्वक लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
Using Almond Oil for Dark Circles :
मध आणि बदाम तेल – Honey and Almond Oil :
अर्धा चमचा मध आणि बदाम तेल एकत्र मिक्स करु घ्या. हे मिश्रण डोळ्यांच्या खालील डार्क सर्कलवर लावा. दोन ते तीन मिनिटं मालिश करा. रात्रभर असंच राहू द्या. सकाळी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
बदामाचे तेल आणि लिंबाचा रस – Almond oil and lemon juice :
एक चमचा बदामाचे तेल घ्या. त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा. हे मिश्रण डोळ्यांखालील डार्क सर्कलवर लावा. दोन मिनिटं मालिश करा. रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Almond oil is beneficial on dark circles.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE