Health First | अॅपल सायडर व्हिनेगर पिण्याने होतील आरोग्यास लाभदायी फायदे
मुंबई ९ मे : कोरोना संकटामुळे जगभर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. जो तो उत्तम आरोग्यासाठी काय खावे-प्यावे याची चौकशी करत आहे किंवा या संदर्भात इंटरनेटवर माहिती शोधत आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक आहारतज्ज्ञ नागरिकांना झोपण्याआधी दररोज एक हेल्दी ड्रिंक पिण्याचा सल्ला देत आहेत. या ड्रिंकच्या सेवनाने अनेक आजारांना दूर ठेवता येईल किंवा आजार झाला तरी लवकर बरे होण्यासाठी मोलाची मदत मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घरच्या घरी हे हेल्दी ड्रिंक तयार करणे शक्य आहे. या हेल्दी ड्रिंकचे (HEALTHY DRINK) नाव आहे अॅपल सायडर व्हिनेगर (APPLE CIDER VINEGAR).
दररोज रात्री झोपण्याआधी अर्धा किंवा एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एक ग्लास पिण्याच्या पाण्यात मिसळा. हे पाणी व्यवस्थित ढवळून घ्या. चवदार हेल्दी ड्रिंक शांतपणे एका जागेवर बसून पिऊन घ्या. नियमित या हेल्दी ड्रिंकचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. जाणून घेऊया नेमके काय काय फायदे होतात. अॅपल सायडर व्हिनेगर सकाळपेक्षा रात्रीच्या वेळी सेवन केल्याने अधिक फायदा होतो. तथापि, ते कोणत्या वेळेत पिणे अधिक फायदेशीर आहे, याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत
सकाळच्या वेळी सेवन
जर, आपल्याला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल, तर सकाळच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगर सेवन करा. सकाळी एका ग्लास पाण्यात, एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून सेवन केल्याने ही समस्या कमी होईल.
रात्रीच्या वेळी सेवन
त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रात्रीच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय तुम्हाला शांत झोप लागते, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. अॅपल सायडर व्हिनेगर, मध आणि कोमट पाण्यात मिसळून प्या.
फायदे
पचनक्रिया सुधारते
अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या हेल्दी ड्रिंकच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. पचायला जड असलेले पदार्थ पचावेत यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर शरीराला मदत करते. यासाठी जेवणानंतर अर्ध्या तासाने हेल्दी ड्रिंक प्या.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर या हेल्दी ड्रिंकचा खूप फायदा होतो. अॅपल सायडर व्हिनेगर फॅट बर्न करते. नको असलेल्या कॅलरीज नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय, रक्तातील साखर देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी लाभदायी
अॅपल सायडर व्हिनेगर या हेल्दी ड्रिंकचे नियमित सेवन माणसाला असलेला कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते. शरीरात कॅन्सरच्या पेशी विकसित होत असतील तर अॅपल सायडर व्हिनेगर या पेशींच्या विकास प्रक्रियेला आळा घालण्यास मदत करते.
तोंड येण्याचा त्रास कमी होतो
अनेकांना वेळी अवेळी झोपणे, चुकीचा आहार घेणे, चुकीच्या पद्धतीने आहार घेणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे उष्णतेचा त्रास होतो. तोंड येण्याचा त्रास सतावतो. यामुळे अनेक पदार्थ खाताना प्रचंड त्रास होतो. काही वेळा पदार्थ खाऊ नये असे वाटते. ही समस्या दूर करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या हेल्दी ड्रिंकचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे.
जखमा बऱ्या होतात
कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या बऱ्या करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर खूप फायदेशीर आहे. हे विविध जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग रोखण्यास मदत करते.
News English Summary: The corona crisis has led to an increase in the consumption of immune-boosting substances around the world. With this in mind, many dieticians are advising citizens to drink a healthy drink every day before going to bed. Experts say that the consumption of this drink can help prevent many ailments or help in speedy recovery. It is possible to make this healthy drink at home. This healthy drink is called Apple Cider Vinegar.
News English Title: Apple Cider Vinegar is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL