Health First | सर्दी-खोकला, Acidity आणि अनेक समस्यांवर गुणकारी अडुळसा
मुंबई, २९ मे | अडुळसा या औषधी वनस्पतीचा वापर आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी औषधोपचारांमध्ये केला जातो. या वनस्पतीचा उपयोग शतकानुशतके औषध तयार करण्यासाठी केला जात आहे. ही संपूर्ण वनस्पती असंख्य रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. आयुर्वेदात अडुळशाची पानं, फुलं, मुळं आणि खोड हजारो वर्षांपासून वापरलं जात आहे. त्यात जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक, सूज कमी करणारे आणि रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत. अडुळसा सामान्यत: दमा, सर्दी आणि खोकला यासारख्या श्वसन समस्यांसाठी वापरला जातो. मात्र हे औषध आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे.
अडुळसा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही अॅकँथेसी कुलातील सदाहरित वनस्पती आहे. आशिया खंडातील भारत, मलेशिया, श्रीलंका आणि म्यानमार या देशात ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर या वनस्पतीची शेती केली जाते. अडुळसा वनस्पतीची उंची सुमारे अडीच मीटर एवढी जास्तीत जास्त असू शकते.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक आजाराचे निदान नैसर्गिकरित्या बरे करण्याचे तंत्रज्ञान होते. यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग मोठा होता. त्यांचा विविध प्रकारे उपयोग करून शरीरातील पाच तत्वे आणि तीन दोष नियंत्रणात आणली जाऊ शकतात याचे संपूर्ण विश्लेषण आयुर्वेदात आहे. जसजसे आपण आधुनिक होत आहोत त्याप्रमाणे रोगांची संख्या वाढत आहे. अशा सर्व रोगांचे समाधान आयुर्वेदात आहे तसेच अडुळसा ही वनस्पती बहुगुणी समजली गेली आहे. खोकला, दमा, श्वसन विकार या विकारांत प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग केला जातो.
सर्दी आणि खोकला:
सर्दी आणि खोकल्यावर हे औषध अनेक दशकांपासून वापरलं जात आहे. अडुळशाची 7-8 पानं पाण्यात उकळा आणि नंतर हे पाणी गाळून त्यात मध मिसळून प्या.
विषाणूच्या संसर्गावर उपचार:
अडुळशाचे अँटीव्हायरल गुणधर्म संसर्गावर उपचार करण्यास सक्षम असतात. अडुळसा शरीराचं तापमान कमी करतं, चोंदलेलं नाक मोकळं करतं. ज्यामुळे श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो आणि आजार बरा होण्याच्या प्रक्रियेस वेग येतो.
अॅसिडीटी दूर होते:
अॅसिडीटी किंवा पोटात जळजळ होणं ही एक सामान्य समस्या आहे. अडुळसा अपचन, जठराची सूज किंवा अॅसिडीटीमध्ये चांगला परिणाम देते. अडुळसा पोटातील आम्ल पदार्थांची निर्मिती कमी करतं. अडुळशाची पूड, जेष्ठमध पावडर आणि आवळा पावडर समान प्रमाणात मिसळा आणि रोज खा.
ब्राँकायटिससाठी उपचार:
ब्राँकायटिसमध्ये ब्राँकियल ट्युब, म्हणजेच श्वास नलिका, जी नाक आणि फुफ्फुसांमधील वायुमार्ग आहे तिला सूज येते. ब्राँकायटिसमध्ये ब्राँकियल ट्युबच्या वरील भागास सूज येते. यामुळे खोकला होतो, कफ येतो. या आजारामुळे छातीत घट्टपणा, सौम्य ताप, धाप लागणं आणि श्वास घेताना घरघर होऊ शकते. अडुळसा या समस्या दूर करण्यास मदत करतं.
घशाची खवखव थांबवतं:
हवामान बदलल्यास सर्दी आणि फ्लूमुळे वारंवार घशात खवखव जाणवते. शिवाय जळजळ होते आणि घशात खाज येत असल्यासारखी वाटते. अडुळशामध्ये उपस्थित अँटीव्हायरल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरियल घटक घशाची खवखव दूर करण्यात मदत करतात.
सांधेदुखी:
सांधेदुखीमुळे दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. युरिक अॅसिडची शरीरातील वाढलेली पातळी अशा वेदनांना कारणीभूत आहे. अडुळसा युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यात मदत करत असल्याने वेदना कमी करते. या औषधी वनस्पतीचे सूज विरोधी गुणधर्म सांध्यातील सुजेस कमी करण्यास मदत करतात.
News English Summary: Adulsa is used in Ayurveda, Homeopathy, Siddha and Unani medicine. This plant has been used in medicine for centuries. This whole plant is used to treat numerous diseases. In Ayurveda, Adulsha leaves, flowers, roots and trunks have been used for thousands of years. It has anti-bacterial, anti-inflammatory and blood-purifying properties.
News English Title: Ayurvedic Adulsa is beneficial for health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY