26 December 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Health First | केळ्याची साल फेकून देता? | त्याआधी जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Banana peel benefits

नवी दिल्ली, ०५ जून |  आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे आणि अनेक लोक नाश्ता म्हणून याचे सेवन दररोज करतात. हे एक सुपरफूड आहे जे अनेक आजारासोबत लढण्यास मदत करते. केळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपल्या पैकी बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर त्याचे छिलके (peels) दूर फेकून देतात.

तुम्ही केळी खाऊन त्याची साल इकडे-तिकडे फेकत असाल तर इकडे लक्ष द्या! तुम्ही ही सवय बदला… कारण, हीच केळीची साल तुमच्या आरोग्यासाठीही पोषक ठरते.

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, केळांच्या सालामध्ये ‘सेरॉटॉनिन हार्मोन्स’ नॉर्मल ठेवण्याचे गुण असतात. व्यक्ती आनंदी राहण्यासाठी या हार्मोन्सची मदत होते. केळीच्या सालात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आणि कार्बोहाइड्रेट असतात. यात बी-6, बी-12, मॅगनीशिअम, एन्टीऑक्सिडेंट, पोटॅशिअम आणि मँगनिझ ही जीवनसत्त्वं आढळतात. हे मेटाबॉलिज्मसाठी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, डोकं दुखत असेल तर केळ्यांची साल बारीक करून त्याची पेस्ट दुखत असलेल्या भागात 15 मिनिटपर्यंत लावल्यानं आराम मिळतो. रक्तातील पेशीमध्ये तयार होणाऱ्या तणावामुळे डोकेदुखी होते. केळाच्या सालीत असलेल्या मॅग्नेशिअम पेशींमध्ये जाऊन डोकेदुखी थांबविण्यासाठी मदत करतं.

केळ्याच्या छिलक्यांचे पुढील प्रमाणे फायदे आहेत:
केळी जेवढी आरोग्यासाठी फायदेशीर असतात किंबहुना त्यापेक्षा जास्त फायदेशीर त्याची छिलके असतात त्यामुळे भारतातील काही राज्यातील लोक केळी साली सकट खातात. तसेच केळ्याच्या सालीचे काही पदार्थ बनवून त्यांचे सेवन करतात. चला तर जाणून घेऊ केळीच्या सालीचे म्हणजेच छिलक्यांचे फायदे काय आहेत.

दातांसाठी फायदेशीर:
आपण जर आपल्या पिवळ्या दातांमुळे (yellow teeth) त्रस्त असाल तर मोत्या सारखे पांढरे दात पाहिजे असतील तर केळीचे छिलके फेकू नका. केळीच्या छिलक्यात सिट्रिक एसिड असते ज्याच्या वापराने आपण आपले पिवळे दात मोत्या सारखे पांढरे चमकदार करू शकता.त्यासाठी केळीच्या छिलक्याचा पांढरा भाग काही वेळ पिवळ्या दातांवर रगडा. त्यानंतर आपले दात टूथपेस्ट ने स्वच्छ करा. काही आठवडे असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.

त्वचेवरील म्हससाठी:
जर आपण त्वचेवरील म्हस ने वैतागले असाल तर केळीच्या छिलक्याचा वापर करा. केळ्याच्या छिलक्यात असलेले अँटीऑक्सीडेंट आणि एंजाइम म्हस पासून सुटका देण्यात आपली मदत करतात. त्यासाठी आपण केळीचे छिलके म्हस वर बांधून त्या पट्टीला रात्रभर ठेवा आणि सकाळी काढा. काही आठवड्यात आपल्याला म्हस पासून सुटका मिळेल.

मुरुमे दूर करण्यासाठी:
केळ्याचे छिलके मुरुमांचा उपचार करण्यासाठी चांगले असते. केळ्यामध्ये अँटीऑक्सीडेंटची शक्ती असते. हे मुरुमांना निर्माण करण्यासाठी मदत करणाऱ्या घटकांशी मुकाबला करते. यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे त्वचेची सूज कमी करण्यास मदत करते. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण त्वचा थंड पाण्याने धुवा, नंतर स्वच्छ टॉवेल ने त्वचा कोरडी करा. त्यानंतर केळीच्या छिलक्याच्या पांढऱ्या भागाने पाच मिनिट मालिश करा. आता आपण 20 मिनिटांनी आपली त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. असे दररोज 2 ते 3 वेळा करा. यामुळे आपल्याला मुरुमांपासून सुटका मिळेल. जर आपण केल्याच्या छिलक्या सोबत हळद पावडर मिक्स करून पाच मिनिट मालिश करा, नंतर 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. असे दररोज 2 वेळा केल्याने त्वचेला मुरुमांपासून सुटका मिळेल.

खाज-खुजली पासून सुटका:
मच्छर चावल्याने किंवा किडा चावल्याने खाज येते. केळ्याच्या छिलक्यात पॉलिसेचराईड असते जे त्वचेमधून सूज आणि श्राव दूर करतो. यासाठी खाज येत असलेल्या जागी छिलके पाच मिनिट मालिश करा. नंतर 20 मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवा. आवश्यकता वाटल्यास पुन्हा हा उपाय करू शकता.

 

News English Summary: Most of us throw away our peels after eating them. But do you know how beneficial the peels that we throw away are for us? Banana peels have antioxidant, antifungal, antibacterial and enzyme properties.

News English Title: Banana peel benefits for health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x