27 December 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY
x

Health First | जाणून घ्या तेजपत्ता आहे आरोग्यास लाभदायी

benefits of bay leaves

मुंबई ८ मे : भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी तेजपत्त्याचा उपयोग साधारणतः केला जातो. लोकांना वाटते याचा वापर केल्याने भाजीला चांगला सुगंध येतो. परंतु या तेजपत्त्याचे काही आरोग्यवर्धक गुणसुध्दा असतात. तेजपत्त्याच्या तेलात अनेक प्रकारचे औषधीय गुण असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. या तेलाने अनेक प्रकारचे ऑयनमेंट बनतात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगस गुण असतात. यामध्ये अँटीऑक्सीडेंटही भरपूर प्रमाणात असते. तेजपत्ता एक प्रकारचा मसाला असतो. ज्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि आयरनचे प्रमाण खुप जास्त असते.

तेजपत्तामध्ये असतात मिनिरल्स:
तेजपत्ताचा काढा बऱ्याच आजारांवर एका औषधांप्रमाणे काम करतो. याचा काढा प्यायल्यानं शरीरातील बऱ्याच प्रकारची कमतरता दूर होते. कारण यात बऱ्याच प्रकारचे मिनिरल्स असतात. तेजपत्ता कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सेलेनियम आणि आयरन देखील असतं. इतकंच नाही तर यात अॅन्टिऑक्सिडेंट्स सुद्धा असतं ज्यामुळे कॅन्सर, ब्लड क्लॉटिंग आणि हृदयाशी निगडीत काही समस्या असतील त्या दूर होतात. यासोबतच तेजपत्ताचा काढा काही अन्य आजरांसाठी खूप फायदेशीर असतो.

जाणून घ्या तेजपत्ताचा काढा पिण्याचे फायदे:
महिलांमध्ये सर्वांत जास्त तक्रारी या कमरे संदर्भात असतात. जर का तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्हा तेजपत्ताचा काढा दिवसभरात दोन वेळ रोज प्यावा. त्यासोबतच तेजपत्ताचं तेल आणून त्यानं कमरेवर मालिश करा. तेजपत्ता मोहरीच्या तेलात शिजवून तुम्ही स्वतःहून देखील तेल बनवू शकता.

थंडी वाजत असताना थंडी वाजल्यानंतर होणारा शरीर दुखी तुम्हाला तेजपत्ताचा काढा पिणं गरजेचं आहे. त्यासोबतच या तेलानं मालिश देखील करा.

दुखापत झाल्यास तुम्हाला तेजपत्ता काढा पिणं गरजेचं आहे आणि त्याचच तेल लावावं. त्यामुळे दुखापत झाल्यानंतर सूज आणि वेदनेतून थोडा आराम मिळतो. तेजपत्ता वाटून जखम झालेल्या ठिकाणी लावावा.

कधी कधी झोपेत नसा खेचल्या जातात किंवा पटकन गोळा येता किंवा नसांना सूज येते. अशाक तेजपत्ताचा काढा, तेजपत्ताचं तेल जरूर वापरा. हे वेगानं आराम देतात.

असा बनवा काढा
१. १० ग्रॅम तेजपत्ता, १० ग्रॅम ओवा, ५ ग्रॅम बडिशेप वाटून घ्या आणि एक लीटर पाण्यात टाकून जोपर्यंत उकळवा तोपर्यंत ते पाणी अर्ध होतं नाही.
२. जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा तो काढा पिण्यास सुरूवात करा.
३. तेजपत्ताचा काढा काही त्रास नसतानाही पिणं चांगलं असतं. त्यामुळे शरीरात होणारी मिनिरलची कमतरता दूर करते.

News English Summary: Bay leaves are commonly used in Indian cuisine for aroma and taste. People think that using it gives a good aroma to the vegetables. But bay leaves also have some health benefits. Bay leaf oil has many medicinal properties. Which are very beneficial for health. This oil forms many types of ointments that have antibacterial and antifungal properties.

News English Title: Bay leaves are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x