Beauty Tips | लिंबू, ब्रोकली वापरून घरच्या घरी तयार करा फेसपॅक
मुंबई, २२ फेब्रुवारी: आपला चेहऱ्याची त्वचा नितळ दिसावी, चेहऱ्यावरचे पुरळ, मुरूम जावेत यासाठी आपण अनेक सौंदर्यप्रसाधनं वापरतो. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. ज्याचा परिणाम आपल्या नाजूक त्वचेवर होतो. यासाठी अनेकदा ब्युटी एक्स्पर्ट नैसर्गिक घटक वापरून घरघुती उपाय करण्याचा सल्ला देतात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गोएल यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना काही घरघुती फेसपॅकची माहिती आपल्याला दिली आहे. जे आपल्या त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.
कोरफरड:
कोरफडीमुळे त्वचा मऊ होते. कोरफड कापून तिचा गर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता, याने लवकर फरक जाणवतो. याव्यतिरिक्त १ चमचा कोरफडीच्या गरात १ टेबलस्पून लिंबाचा रस टाकावा. हे फेसपॅक २० मिनिटांनंतर धुवून टाकावं.
ब्रोकली फेसपॅक:
ब्रोकलीमध्ये अ आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. अतिनिल किरणांमुळे होणारं त्वचेचं नुकसान भरून काढण्यास ब्रोकली फायदेशीर आहे. एक मुठभर ब्रोकली पाण्यात उकळावी. उकडलेली ब्रोकलीची पेस्ट करून घ्यावी. यात १ टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून दही घालावं. यात १ चमचा लिंबाचा रस घालावा. हे ग्रीन मास्क २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवावं आणि नंतर धुवून टाकावं. उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेसाठी हे मास्क फायदेशीर आहे.
लिंबू फेसपॅक:
प्राचीन काळापासून लिंबूचा वापर नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. लिंबू हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. लिंबातील अनेक घटक त्वचेच्या कित्येक समस्या दूर करतात. १ टीस्पून बेकिंग सोड्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. या मिश्रणानं चेहऱ्यावर मसाज करावा दहा मिनिटांनंतर चेहरा थंडा पाण्यानं धुवावा हे मिश्रण स्क्रीन लाइटनिंग स्क्रब म्हणून काम करतं. याशिवाय त्याच मिश्रणात एक मोठा चमचा साखर घालावी. हे मिश्रण हाताचे कोपर, गुघडे यांचा काळवंडलेपणा दूर करतं.
सुरकुत्या कमी करण्यासाठी अंड फेसपॅक:
वाढतं वय, तणाव यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही अंड्यापासून तयार केलेलं फेसपॅक वापरू शकता.
१ अंड्याचा पांढरा भाग घेणे. यात १ टेबलस्पून दही आणि १ टेबलस्पून ब्राऊन शूगर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण दहा मिनिटं चेहऱ्यावर ठेवावं. दहा मिनिटांनंतर चेहऱ्यावर हलका मसाज करून कोमट पाण्यानं हे मास्क धुवून टाकावं.
News English Summary: We use many cosmetics to make our facial skin look smooth, get rid of acne and pimples on the face. These cosmetics contain a large amount of chemicals. Which affects your delicate skin. For this, beauty experts often recommend home remedies using natural ingredients. Dermatologist Dr. Goel while talking to Hindustan Times has informed us about some homemade face packs. Which will definitely be beneficial for your skin.
News English Title: Beauty tips on homemade face pack for glowing skin news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो