26 December 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

Health First | बीटाचा पाला फेकून देऊ नका | डाएटसाठी आहे परफेक्ट पदार्थ - वाचा सविस्तर

Beetroots leaves benefits

मुंबई, ०९ जून | बीट आपण नेहेमीच खातो पण बीटासोबत येणाऱ्या पाल्याचं आपण काय करतो? अनेकजण तर बीट विकत घेताना आधी तो पाला कापून मगच बीट पिशवीत टाकतात? बीटाचा पाला टाकून केवळ बीट खाणं हे शहाणपणाचं लक्षण नाही असं तज्ज्ञ सांगतात. बीटापेक्षाही बीटाच्या पाल्यात खूप गुण असतात म्हणून बीटाचा पाला फेकून न देता खायला हवा. बीटाच्या पाल्याची भाजी, सलाड, स्मूदी, पराठे असे विविध प्रकार करता येतात. बीटाच्या पाल्यापासूनचा प्रत्येक प्रकार हा पौष्टिक आणि चविष्ट असतो.

बीटाच्या पाल्यानं आपल्याला काय मिळतं:

  1. बीटाच्या पाल्यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी क जीवनसत्त्वाची गरज असते. एक कप शिजवलेल्या बीटाच्या पाल्यात ६० टक्के पोषणमूल्यं असतात. तसेच बीटाचा पाल्यात फॅटस आणि उष्मांकही कमी असतात.
  2. बीटाच्या पाल्यात नायट्रेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं ते रक्त शुध्द ठेवतं, शिवाय रक्त दाब कमी करण्यास मदत करतं. नायट्रेटमूळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते शिवाय हदयाचं कार्यही सूधारतं.
  3. बीटाच्या पाल्यात असलेलं कॅल्शिअम हाडांची ताकद वाढवतं. शिवाय ऑस्टॉपॉरोसिस या आजाराला रोखतं. शिवाय के जीवनसत्त्व हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. के जीवनसत्त्वं हे आहारातून हाडांना कॅल्शिअम मिळवण्यासाठी बळ देतं. त्यामुळे जे केवळ शाकाहारी आहेत त्यांनी हाडांची ताकद वाढवण्यासाठी आवर्जून बीटाचा पाला खायला हवा असं डॉक्टर सांगतात.
  4. मानसिक आरोग्य सुधारण्याची ताकद बीटाच्या पाल्यात असते. बीटाच्या पाल्यात बी६ हे जीवनसत्त्वं असतं. बी६ हे जीवनसत्त्वं मूड सूधारण्यासाठी, नैराश्यावर मात करण्यासाठी महत्त्वाचं असतं. शिवाय बीटाच्या पाल्यात असलेल्या के जीवनसत्त्वामुळे अल्झायमर असलेल्या रुग्णास फायदा मिळतो. अल्झायमरची वाढ कमी होते.
  5. बीटाच्या पाल्यात लोह मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे अ‍ॅनेमियावर मात करण्यासाठी बीटाचा पाला आहारात असण्याला खूप महत्त्व आहे. बीटाच्या पाल्यामुळे लाल रक्त पेशी वाढतात.
  6. त्वचा छान ठेवायची असेल तर बीटाचा पाला खायलाच हवा. बीटाच्या पाल्यात असलेल्या क जीवनसत्त्वामुळे आणि शुध्दीकरणाच्या गुणधर्मामुळे तेजस्वी त्वचेसाठी बीटाच्या पाल्याचा उपयोग होतो. क जीवनसत्त्वामधे असलेल्या अ‍ॅण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलॅजन घटकाची निर्मिती जास्त प्रमाणात होते. बीटाच्या पाल्यातील तंतूमय घटकांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्याचा उपयोग त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो.
  7. पचनकार्य सुधारण्याकामी बीटाच्या पाल्याचा उपयोग होतो. तसेच पोटात आवश्यक मित्र जीवाणू तयार करण्याचं काम बीटाच्या पाल्यातील गुणधर्म करतात.

 

News English Summary: We always eat beet but what do we do with the beet that comes with Beetroots? Many people, when buying beets, first cut the leaves and then put the beets in the bag. Experts say that it is not wise to eat beet leaves alone. Beta leaves have more properties than beta leaves, so beet leaves should be eaten without throwing them away. Beet leaves can be made into a variety of vegetables, salads, smoothies, parathas Every variety from beta leaves is nutritious and tasty.

News English Title: Beetroots leaves benefits health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x