24 November 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Health First | जाणून घ्या बेलफळाचे आरोग्यवर्धक फायदे

benefits of belphal

मुंबई २५ मे : बेलपत्र आणि बेलफळ हे सामान्यतः शंकराची पूजा करण्यासाठी वापरले जाते.परंतु आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील बेलफळ फायदेशीर आणि महत्वाचे आहे. यामध्ये ह्रदयाला बळ आणि मेंदूला स्फूर्ती आणि सात्विक शांती प्रदान करण्याची क्षमता आहे. हे स्निग्ध, मऊ असून याचा गर, पाने, तसेच बियांमध्ये तेल असते. हे तेल सुद्धा औषधी आहे. विशेषतः उन्हाळ्यात हे थंडावा देण्यासह आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. याचे काही गुणधर्म जाणून घेऊ या.

या आजारांवर गुणकारी:

* बेलमध्ये लेक्साटिव तत्वाचा स्तर जास्त प्रमाणात असतो. हे शरीरातील रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवते. शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. यामुळे डायबिटीजमध्ये आराम मिळतो.

* पिकलेल्या बेलफळाचा गर काढून तो सावलीत सुकवावा. त्यानंतर वाटून त्याचे चूर्ण बनवावे. हे चूर्ण सहा महिन्यांपर्यंत वापरता येते. हे पाचकतत्त्वांनी परिपूर्ण असते. आवश्यक वाटल्यास २ ते ५ ग्रॅम चूर्ण पाण्यात मिसळून घेऊ शकता.

* कच्चे बेलफळ भूक पचनशक्ती वाढविणारे तसेच कृमींचा नाश करणारे आहे. हे मलासह जलीय अंशाचे शोषण करणारे असल्याने अतिसारात अत्यंत गुणकारी आहे.

* एक पिकलेला बेलाचा गर रात्री मातीच्या भांड्यात भिजवून ठेवावा. सकाळी पाणी गाळून यात खडीसाखर मिसळावी. दररोज हे पाणी प्यावे. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्फूर्ती येते.

* बेलफळाच्या गराचा ३० ते ५० मि.ली. काढा मध मिसळून प्यायल्याने त्रिदोषजन्य उलटीत गुण येतो. गर्भवती स्त्रियांना उलटी व जुलाब झाल्यास २० ते २५ मि.ली. काढ्यात सातूचे पीठ मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

* गोमुत्रात बेलफळ वाटून तयार झालेले मिश्रण १०० मि.ली. दुध, ३०० मि.ली. पाणी तसेच १०० मि.ली.तिळाच्या तेलात मिसळून मंद आचेवर उकळावे. हे बिल्वसिध्द तेल दररोज ४-४ थेंब कानात टाकल्याने कानदुखी व बहिरेपणात लाभ होतो.

* नियमितपणे बेलाच्या रसाचे सेवन केल्यास हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

* आयुर्वेदामध्ये बेलापासून काढलेल्या तेलाचा वापर दमा आणि श्वसनाच्या रोगांवरील उपचारामध्ये केला जातो.

* २०० मि.ली. पाण्यात २५ ग्रॅम बेलाचा गर आणि २५ ग्रॅम खडीसाखर मिसळून सरबत बनवावे. हे प्यायल्याने छाती, पोट, डोळे तसेच तळपायांची जळजळ थांबते.

* एका बेलाचा गर १०० ग्रॅम पाण्यात उकळावा. गार झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. व्रण बरे होतील.

News English Summary: Belpatra and belphal are commonly used to worship Lord Shiva. But belphal is also beneficial and important from the point of view of health. It has the ability to strengthen the heart and provide inspiration and sattvic peace to the brain. It is oily, soft and contains oil in the husk, leaves and seeds. This oil is also medicinal. Especially in summer it is beneficial in terms of health as well as giving coolness. Let us know some of its properties.

News English Title: Belphal is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x