28 January 2025 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health First | विड्याच्या पानाचे सेवन करा | हे अनेक आजार होतील दूर - नक्की वाचा

Benefits of Betel Leaves

मुंबई, १० सप्टेंबर | आपल्याकडे परंपरागत पूजाविधीमध्ये विड्याच्या पानाला एक विशेष महत्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यासाठी विड्याची पाच पान ही हवीच. शिवाय एक काळ असा होता जेव्हा घरातील मोठी माणसं जेवल्यानंतर आवडीने विड्याचे पान अगदी कात आणि चुना लावून खायचे. पण आताची परिस्थिती पहाल तर विड्याची पाने घरात एखादी पूजाविधी असेल तरच आणली जातात. त्यामुळे घरात विड्याची पाने दिसणे अगदी दुर्मिळ बाब झाली आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. अजूनही अनेक लोकांना विड्याच्या पानांचा वापर धार्मिक विधींशिवाय होतो हेच माहीत नाही. म्हणूनच आज आपण या पानांचा औषधी वापर जाणून घेणार आहोत.

विड्याच्या पानाचे सेवन करा, हे अनेक आजार होतील दूर – Benefits of Betel Leaves in Marathi :

विड्याच्या पानांना आयुर्वेदात खुप महत्व आहे. कारण या पानांमध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात जे विविध आजारांवर अतिशय प्रभावी मानले जातात.

१) डोकेदुखीवर विड्याचे पान गुणकारी आहे. त्यामुळे डोकं दुखत असेल तर विड्याच्या पानांचा लेप कपाळावर ३० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने धुऊन टाका. यामुळे डोकेदुखी ताबडतोब थांबते.

२) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ केमिकल बायोलॉजीने २०१२ साली केलेल्या संशोधनानुसार विड्याच्या पानात अशी तत्त्व आढळून आली आहेत जी ‘क्रॉनिक माइलॉइड ल्यूकेमिया’सोबत लढाण्यास उपयोगी ठरतात. या गुणधर्मांमुळे ‘बोन मॅरो कॅन्सर’ बरा होण्यास मदत होते.

३) पचनक्रिया सुधारण्यासाठी विड्याचे पान पाचकासारखे काम करते. शिवाय विड्याचे पान खाल्ल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो.

४) विड्याची पाने आपले शरीर मिनरल्स आणि पोषक द्रव्य घेऊ शकेल अश्या पद्धतीने कार्यरत असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही विड्याची पाने उपयोगी ठरतात.

Amazing Benefits Of Betel Leaves Nobody Told You :

५) जर खोकला येत असेल आणि कफ साठत असेल तर यासाठी विड्याच्या पानात हळद टाकून ते चावून चावून त्याचा रस चघळत खावे. यामुळे खोकला लगेच थांबतो.

६) जर मुका मार लागल्यामुळे सूज आली असेल तर यावर विड्याचे पान हलके गरम करून बांधून ठेवा. हे पण बांधल्यामुळे चढलेली सूज उतरते.

७) लहान मुलांच्या पोटात खूप लवकर जंत होतात. त्यामुळे विड्याचे पान त्यांच्यासाठी उत्तम औषध आहे. विड्याच्या पानाचे रस मुलांना दिल्याने पोटातील जंतावरही आराम मिळतो.

८) विड्याचे पान चघळून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी निघून जाते. इतकेच नव्हे तर, दररोज आंघोळीच्या पाण्यात विड्याची पाने टाकल्यास पाणी निर्जंतुक होते आणि शरीराला येणारी खाज दूर होते. यामुळे त्वचेच्या समस्या होत नाहीत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of Betel Leaves in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x