Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा
मुंबई, १६ सप्टेंबर : कडीपत्त्याचा वापर भारत आणि दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. याच्या असंख्य गुणांमुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिध्द झाला आहे. यामुळे जेव्हाही तुमच्या प्लेटमध्ये कडीपत्ता येईल तेव्हा याला बाजूला काढू नका. तो तुमचे केस आणि त्वचेसाठी महत्त्वाचा आहे, तसाच इतर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो.
चला तर मग पाहुयात या कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे.
१. एनीमिया होण्यापासून वाचवतो:
कडीपत्ता आयर्न आणि फॉलिक अॅसिडचा स्रोत असतो. आयर्नची कमतरता फक्त शरीरात आयर्न नसल्याने नाही तर शरीरामध्ये आयर्न मुरत नरल्यामुळेही होते. याव्यतिरीक्त फॉलिक अॅसिड आयर्न शोषून घेण्यास मदत करते. कडीपत्ता या दोन्ही कामांसोबत एनीमिया कमी करण्यात मदत करतो.
२. यकृतासाठी फायदेशीर:
जर तुम्ही सतत दारुचे सेवन करत असाल आणि यामुळे यकृताला धोका पोहोचत असेल तर जेवनात कडीपत्ता खाणे विसरु नका. संशोधनानुसार दारुमुळे यकृताला धोका निर्माण होतो. परंतु तुम्ही जर कडीपत्त्याचे सेवन केले तर त्यामधील व्हिटामिन ए आणि सी यकृताला योग्य प्रकारे काम करण्यासाठी मदत करतात.
३. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते:
कडीपत्त्यामध्ये जे फायबर असतात, ते रक्तामधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगरचे प्रमाण कमी करते. यासोबतच कडीपत्ता पचन शक्ती वाढवून वजन कमी करण्यासाठी मदत करतो.
४. हृदय रोगापासून दूर ठेवतो:
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, कडीपत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉलला कमी करुन एक चांगली भूमिका बजावतो. हे रक्तामधील चांगल्या कोलेस्ट्रॉलाच्या प्रमाणात वाढ करून हृदयरोग आणि एन्थेरोक्लेरोसीसचे रक्षण करते.
५. पचनशक्ती वाढवते:
कडीपत्त्यातील गुण अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून दूर ठेवतात. आयुर्वेदात मानले जाते की, कडीपत्त्यामध्ये जे लॅक्सेटिवचे गुण असतात ते पोटाला शांत ठेवतात आणि पचनशक्ती वाढवतात.
६. अतिसारच्या लक्षणांपासून वाचवते:
कडीपत्त्यामध्ये जे माइल्ड लॅक्सेटिवचे गुण असतात ते अतिसारापासून आराम देण्यात मदत करतात. कारण यामधील जीवाणूविरोधी आणि आणि वेदनाशामक गुणांमुळे हे पोटातील वेदनांना लवकर शांत करतात. कडीपत्ता शरीराच्या तीन दोषांना संतुलित करुन पोटातील पित्तदोषाला कमी करतो.
७. केमोथेरपीच्या साइड इफेक्टला कमी करतो:
संशोधनानुसार कडीपत्त्यामध्ये एवढी क्षमता असते की तो केमोथेरपी आणि रेडियोथेरपीमुळे शरीराला होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतो. हे क्रोमोसोम्स आणि बोन मॅरोला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवून शरीरात फ्री-रॅडिकल्स तयार होण्यापासून थांबवते. याच प्रकारे कडीपत्ता शरीराला कॅन्सर होण्यापासूनसुद्धा वाचवतो.
८. छाती आणि नाक:
जर तुम्ही खोकला, साइनस किंवा कफने त्रस्त असाल तर कडीपत्त्याचा आपल्या आहारात वापर करा, तुमचा त्रास कमी होईल. कडीपत्त्यामधील व्हिटॅमिन सी, वेदनाशामक आणि अँटी-ऑक्सिडेंट हे गुण कफ साचू देत नाही.
कफामुळे छाती गच्च झाल्यास आराम मिळवण्यासाठी एक छोटा चमचा कढीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध टाकून पेस्ट बनवा आणि दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास कफाचा त्रास कमी होतो.
९.स्किन इन्फेक्शन होत नाही:
कडीपत्त्याचे अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण नखातील फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून वाचवतात. यासोबतच यांना लवकर बरे करण्यासदेखील मदत करतात.
१०. केस लवकर वाढतात:
कडीपत्त्यामधील पौष्टीकतेमुळे केसांच्या समस्या उद्भवत नाहीत. यामुळे अवेळी पांढरे होणारे केस, केसांचे गळणे, केस पातळ होणे, कोंडा अशा अनेक समस्यांपासून कडीपत्ता आपल्याला दूर ठेवतो. केसांना मजबूत बनवण्यासाठी आणि कोंड्यापासून वाचण्यासाठी कढीपत्त्याचा ज्युस १०० एम.एल. खोबर्याच्या तेलात मिसळावा. मिश्रण काळे होईपर्यंत गरम करुन डोक्यावर लावल्यास केसांना त्याचा खूप फायदा होतो.
News English Summary: Curry leaves or kadi patta (as popular in India) are known for their unique flavor , and are widely used and consumed in India. They are one of the most widely used ingredients used for tempering Indian cuisines and dishes. These leaves come from the curry leaf tea or murraya koenigii (scientific name). Most of us throw away the curry leaves while eating, though we enjoy the taste that has been already infused into our dishes. After reading this, you will never again do this, because of the innumerable health benefits of curry leaves we are going to tell you about. Ayurvedic research has also suggested many healthy benefits of curry leaves.
News English Title: Benefits of curry Patta health fitness Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today