Health First | आरोग्यदायी बीट | रक्त वाढीसाठी आणि हाडे, दात मजबुतीसाठी
मुंबई, २२ ऑक्टोबर : बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे.
आहारात बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे नक्की वाचा:
रक्त वाढते- लोह आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बीटचा उपयोग रक्त वाढवण्यासाठी होऊ शकतो. रोज सकाळी एक कप बीटचा रस प्यावा.
बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.
- बीटचा रस प्यायल्याने शारीरिक ताकद वाढते तसेच वजन वाढत नाही आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
- कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. बीट खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊन दात आणि हिरड्या मजबूत होतात.
- बीटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फायबर असल्यामुळे त्यांचा रंग लाल आणि जांभळा असतो. शरीरामधील असलेला एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा त्रास कमी होतो. बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो. बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्टता दूर करण्यासाठी मदत होते. बद्धकोष्टता दूर करण्यासाठी औषध म्हणून बीटचा उपयोग होतो.
- बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. बीटमध्ये असलेल्या नाइट्रेट घटकांमुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होण्यास मदत होते.
बीटमुळे कप होण्याची समस्या दूर होते. त्यामुळे श्वसननलिका स्वच्छ ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे करतो. बीडच्या रसामध्ये मध टाकून जर शरीरावर खाज येत असेल त्या जागेवर लावले तर होणाऱ्या खाज येण्याची समस्या दूर होते तसेच बीट मुळे सांधेदुखीचा त्रास ही भरपूर प्रमाणात कमी होतो. म्हणून आपण आहारामध्ये सुयोग्य प्रमाणात जर बीटचा वापर केला तर शरीरासाठी ते फार फायदेशीर ठरू शकते.
Article English Summary: Beetroots, commonly known as beets, are a popular root vegetable used in many cuisines around the world. Beets are packed with essential vitamins, minerals and plant compounds, some of which have medicinal properties. What’s more, they are delicious and easy to add to your diet. This article lists 9 health benefits of beets, all supported by science. Beets boast an impressive nutritional profile. They are low in calories, yet high in valuable vitamins and minerals. In fact, they contain a bit of almost all the vitamins and minerals that you need. Beets also contain inorganic nitrates and pigments, both of which are plant compounds that have a number of health benefits.
Article English Title: Benefits of eating beets increased blood with keeping bones and teeth strong health article.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER