3 December 2024 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Eating Fish | तुम्ही आठवड्यातून २ वेळा मासे खाल्यामुळे काय होतं | या 3 मोठ्या आजारांपासून सुटका

Benefits, Eating Fish, Health fitness, Marathi News ABP Maza

Eating Fish : कोणत्याही प्रकारचे मासे ते गोड्या पाण्यातील असतील किंवा खर्‍या पाण्यातील असतील, दोघांचे स्वत:चे असे खास गुणधर्म असतात, जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. माशांच्या सेवनामुळे होणारे फायदे दीर्घकाळपर्यन्त आपली तब्येत उत्तम ठेवण्यास मदत करतात.

तसे बघितले तर, मासे हे बंगाली लोकांच्या जेवणातील एक खास पदार्थ आहे. बंगाली समाजाचे लोक बुद्धिमान असतात, कारण ते माशांचे भरपूर सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला आणि बुद्धीला योग्य पोषण मिळते. माशांमध्ये असलेली पोषक तत्वे आपला शारीरिक आणि मानसिक विकास करतात.

माशांमध्ये असलेली पोषक तत्वे, आपल्या रोजच्या जेवणातील प्रथिनांची कमी भरून काढतात, कारण यामध्ये मिनरल्स, प्रथिने आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या माशांचा उपयोग विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. काही समुद्री मासे, जसे बांगडा, सुरमई, आणि पेडवे यामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फैटी एसिड मुबलक प्रमाणात आढळून येते. हे बुद्धीच्या विकासासाठी खूपच जरूरी आहे. हेच कारण आहे, की मुलांना आणि गर्भवती महिलांना दिल्या जाणार्‍या आहारात माशांचा प्रामुख्याने समावेश केलेला असतो.

आज आम्ही तुम्हाला मासे सेवन केल्यामुळे काय फायदे होतात ते सांगणार आहोत. असे तर, तुम्ही सगळेच जाणता, की माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनांची मात्रा असते आणि माशांमध्ये आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्याची क्षमता आहे. चला तर मग जाणून घेऊया, आणखी काही फायदे तुमच्या माहितीसाठी:

हृदयरोगांमध्ये:
ज्यांना हृदयासंबंधित काही आजार आहेत, त्यांनी माशांचे सेवन केले पाहिजे, कारण माशांमध्ये ओमेगा ३ फैटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे हृदयात होणार्‍या रक्ताच्या गुठळ्यांना नष्ट करतात आणि हार्ट अॅटक सारख्या समस्येपासून आपल्याला वाचवते. टी. बी सारखा आजार: ज्या लोकांना टी बी हा आजार असतो, त्यांनी रोज एका पूर्ण माश्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन केले पाहिजे. जर त्यांनी रोज एक तयार माशाचे सेवन केले, तर त्यांचा टीबी हा आजार लवकर बरा होऊ शकतो.

प्रोटेन्सची कमतरता:
ज्या लोकांच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असते, त्यांनी माशाचे सेवन जरूर केले पाहिजे. कारण माशांमध्ये बाकी सर्व पदार्थांपेक्षा प्रथिने अधिक प्रमाणात असतात.

तेजस्वी दृष्टीसाठी:
ज्या लोकांचे डोळे दुर्बल असतात किंवा कमजोर असतात, जे लोक संगणक आणि मोबाइलवर जास्त वेळ काम करतात, त्या व्यक्तींचे डोळे कमजोर होत जातात, तर अशा लोकांनी आठवड्यातून दोनदा माशाचे सेवन केले पाहिजे. परंतु, काही माशांमध्ये पार्‍याचे प्रमाण अधिक असते, असे मासे खाणे शरीरास अपायकारक आहे, हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे. त्याप्रमाणे माशांची खाण्यासाठी योग्य निवड केली पाहिजे.

News English Title: Benefits of eating Fish 2 times a week Health fitness Marathi News check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x