26 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

Health First | भाजलेल्या चण्यांचे भन्नाट फायदे माहित आहेत का | वाचा आणि समजून घ्या

Benefits, Eating roasted gram, health fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, १९ सप्टेंबर : भाजलेल्या चण्यांमध्ये कितीतरी पोषण मूल्ये आढळतात. हे कितीतरी शारीरिक व्याधींपासून आपली सुटका करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया, महिनाभर भाजलेले चणे खाल्ल्यामुळे काय फायदे होतात.

मधुमेहीना फायदा:
भाजलेले चणे खाल्ल्यामुळे मधुमेही रोग्याना खूप फायदा होतो. भाजलेले चणे शरीरातील ग्लुकोजची मात्रा शोषून घेतात, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहातो. मधुमेही लोकांनी जर रोज भाजलेले चणे खाल्ले, तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. याशिवाय, भाजलेले चणे रात्री झोपताना चावून गरम दुधाबरोबर खाल्ले तर, श्वासनलिकेचे आजार दूर होतात.

लघवीच्या समस्येवर उपाय:
ज्या लोकांना वारंवार लघवी होण्याची समस्या आहे, त्या लोकांनी सकाळी चण्याबरोबर गूळ खाल्ला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या या समस्येवर फायदा होईल. काही दिवसातच त्यांना आराम पडेल.

कमजोरी दूर होते:
संशोधनात असे आढळून आले आहे, की भाजलेले चणे खाल्ल्यामुळे शरीरातील अशक्तपणा जाऊन ताकद येते. म्हणूनच, लोकांनी भाजलेले चणे खाल्ले पाहिजेत. चणे आपली पचनशक्ती संतुलित ठेवतात आणि बुद्धीची तल्लखता वाढवतात. भाजलेल्या चण्यांमुळे पचनसंस्था सुरळीत काम करते व तुमचे पोट साफ राहते. बद्धकोष्टता असेल तर ती समस्या दूर होते. चण्यामुळे रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेला तकाकी येते. चण्यामध्ये फोस्फोरस असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवते आणि मूत्रपिंडातून जास्तीचे मिठाचे प्रमाण कमी करते.

लठ्ठपणापासून सुटका:
संशोधनात असेही आढळून आले आहे, की जे लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, आणि आपले वजन कमी करू इछितात, तर त्यांच्यासाठी पण भाजलेले चणे सकाळी न्याहारीला रोज ५० ग्राम खाल्ले, तर ३० दिवसात त्यांचे वजन कमी होते. तुमची रोगप्रतिकारक शक्ति भाजलेले चणे खाल्ल्यामुळे वाढते, त्यामुळे अनेक आजारांपसून तुमचे संरक्षण होते.

हृदयरोगापासून बचाव:
भाजलेले चणे कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य ठेवतात. त्यामुळे हृदयरोगापासून दूर राहाण्यास मदत होते. परंतु, भाजलेले चणे खाताना एक खबरदारी घेतली पाहिजे, ती म्हणजे, चणे नेहमी सावकाश व चावून खाल्ले पाहिजेत. नाहीतर गॅसची समस्या होऊ शकते. एक मूठ चणे रोज खाण्यास काही हरकत नाही, पण त्यापेक्षा त्याचे सेवन जास्त करू नका.

नपुंसकता दूर होते:
भाजलेले चणे जर मधासोबत खाल्ले तर नपुंसकता दूर होते. एखाद्या पुरुषाचे वीर्य जर पातळ असेल, तर चणे खाल्ल्यामुळे फायदा होतो. दातांच्या मजबुतीसाठी: भाजलेले चणे खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात, कारण भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम मुबलक असते, जे दातांसाठी खूप जरूरी आहे.

भाजलेल्या चण्यांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असल्यामुळे ते खाल्ल्यामुळे स्नायू बळकट होतात. नियमित जर सकाळी भाजलेले चणे खाल्ले, तर शरीरास पुरेशी ऊर्जा मिळते. दुर्बलता कमी होऊन हाडे मजबूत होतात.

 

News English Summary: Roasted gram, also known as roasted chickpeas, are eaten as snack in South-Asian countries with raisins. There wouldn’t be any disagreement on the fact that these are in fact a healthy snack. The reason people in South-Asia have included these snack in their daily intakes is the old tradition passed on to the generations with a belief that roasted grams’ increase stamina. But all of the other health benefits that roasted grams have to serve are yet unknown to people. So we have compiled some more worth knowing reasons to make roasted grams a part of your diet.

News English Title: Benefits of eating roasted gram health fitness Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x