26 December 2024 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Health First | ज्वारीची भाकरी खाण्याचे काय आहेत फायदे? | वाचा सविस्तर

Benefits of Jwarichi Bhakri

मुंबई, ०१ जून | आपल्या अहारीय पदार्थंमध्ये झालेला बदल व जंक फूडचा मोठा वापर यामुळे लोकांच्या आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश न करता पाश्चात्य आहारीय पद्धतीचा जास्त अवलंब केला जातो. त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षापासून शहरी भागात ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात.

याच आरोग्यदायी ज्वारीचे फायदे आज आपण ह्या लेखातून जाणून घेणार आहोत. ज्वारीचे लाल व पांढरी असे दोन प्रकार असतात. सोलापुरी व खान्देशी ज्वारी संपुर्ण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. ज्वारी खूप पौष्टीक आहे. ज्वारी थंड गुणधर्माची आहे.

भरपूर कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण:
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती उर्जा दिवसभर कामी येते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात. पोळी, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्याचं स्थान निर्माण झालंय. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा शरीरात अभाव जाणवतो.

ज्वारीच्या सेवनाने होणारे फायदे:

  1. सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
  2. वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.
  3. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.
  4. ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.
  5. सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
  6. ज्वारीत असणारी पोषक तत्व किडनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.
  7. ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

 

News English Summary: Today we will learn the benefits of healthy sorghum in this article. There are two types of sorghum, red and white. Solapuri and Khandeshi sorghum are very famous all over Maharashtra. Sorghum is very nutritious. Sorghum has cooling properties.

News English Title: Benefits of eating sorghum bread Jwarichi Bhakri health benefits news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x