21 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा

Benefits of having a Fever

मुंबई, २२ सप्टेंबर | काही लोकांना ताप आला, आजारी पडले की बरं वाटतं. कारण त्यामुळे जवळची व्यक्ती खूप काळजी घेणे, हवं नको पाहते. ताप हा एक आजार असला तरी त्यामुळे काही फायदे देखील होतात. ताप आल्यानंतर शरीरात काही गंभीर बदल होतात. म्हणजेच तुमचे शरीर तापावर मात करण्यासाठी अधिक प्रयत्न करतं. शरीरात शिरलेल्या घातक विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करतं.

Benefits of Fever, ताप येण्याचे शरीरासाठी असे ‘४’ प्रकारे फायदे – Benefits of having a Fever :

पूर्वी म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या पिढीत ताप येण्याची भीतीनेच पॅरासिटामॉल घेतली जायची. परंतु, आता काही आरोग्यावर काम करणाऱ्या संस्था ताप येणं वाईट असल्याचे समजत नाही. खरंतर ताप येणं हे इम्म्युनिटी सिस्टीमसाठी चांगले असल्याचे मानले जाते. या काही मार्गांनी ताप येणे फायदेशीर ठरते.

Benefits-of-having-a-Fever

तापामुळे रोगप्रतिकारक संस्थेचे कार्य अधिक चांगले होते:
रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास हेल्दी राहण्यास मदत होते. तसंच बॅक्टरीया, व्हायरस यांसारख्या विषाणूंशी सामना करण्यास, शरीरातील कार्य सुरळीत चालण्यास फायदा होतो. ताप येण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. the Department of Immunology आणि Roswell Park Cancer Institute च्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, तापामुळे रोगप्रतिकारक संस्थेचे कार्य सुधारते.

तापामुळे व्हायरस नष्ट होतात:
व्हायरस शरीरात छुप्या पद्धतीने शिरतात आणि शरीरात बिघाड करून शरीराच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. अगदी सर्दीपासून ते हिपॅटायटीपर्यंत तसंच इतर आजारांसाठी व्हायरस कारणीभूत ठरतात. lymphocyte CD8+ cytotoxic T-cell हा अतिशय कार्यक्षम सेल असून त्यामुळे व्हायरस नष्ट होतात. तसंच ट्युमर वाढीला आळा बसतो. जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान वाढते तेव्हा या सेल्सच्या निर्मितीत देखील वाढ होते. त्यामुळे शरीरातील इन्फेकशन कमी होण्यास मदत होते. Interferons हा शरीरातील व्हायरसवर मात करणारा सेल आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तापामुळे Interferons सेल्सच्या वाढीस चालना मिळते.

Look at how the fever actually benefits the body :

तापामुळे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते:
innate immune system हा इम्म्युनिटी सिस्टीमचा एक भाग आहे. इम्म्युन सेल्सचे प्रमाण वाढवणे, बॅक्टरीया आणि इतर विषाणू, नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यास या सिस्टीमचा फायदा होतो. तसंच ताप आल्यानंतर पुन्हा तरतरीत होण्यासाठी या सिस्टमची मदत होते.

कॅन्सरवर मात करण्यासाठी तापाचा फायदा होतो:
काही प्रकारचे कॅन्सर बरे करण्यासाठी hyperthermia किंवा तापाची मदत होते. Focal hyperthermia ४० डिग्रीच्या वर गेल्यास कॅन्सरचे सेल्स नष्ट होतात आणि इम्म्युनिटी सिस्टिमची अँटी ट्युमर अॅक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होते.

याचा अर्थ तापाचे काही दुष्परिणाम नाहीत, असे नाही. थंडी वाजून खूप ताप आल्यास आणि इतर लक्षणे दिसून आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक वाढलेल्या तापाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Benefits of having a Fever.

 

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x