26 December 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

Health First | शेंगदाण्याचे आरोग्यदायी फायदे | पचनशक्ती सुधारेल आणि भूक वाढवेल

Benefits of peanuts

मुंबई, ०६ जून | शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.

काय आहेत शेंगदाणा खाण्याचे फायदे:
जर आपल्याला खोकला येत असेल तर शेंगदाणा उपयुक्त अशा औषधाचे काम करते. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच काही लोकांना भूक न लागण्याची समस्या असते ती दूर होते.दुसरे म्हणजे गर्भवती स्त्रियांसाठी शेंगदाण्याचे सेवन अतिशय फायद्याचे असते. गर्भावस्थेत असलेल्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे असते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा ६ फॅट्स सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्वचेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे शेंगदाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

साधारणतः जेवण झाल्यानंतर जर आपण पन्नास ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते आणि रक्ताची कमतरता भासत नाही. आठवड्यातून कमीत-कमी तीन ते चार दिवस शेंगदाण्याचे सेवन केले तर हृदयविकार होण्याच्या संभव कमी होतो. रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. लीपो प्रोटीन नावाच्या कोलेस्ट्रॉलची मात्रा जवळजवळ ७.४ टक्के घटते. प्रोटीन, फायबर, विटामिन आणि एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्याचाही त्वचेसाठी फायदा होतो. महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दररोज थोडसे शेंगदाणे खाणे फायद्याचे असते. शेंगदाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण असल्यामुळे पोटाचे विकार नाहीसे होतात. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने ऍसिडिटी आणि गॅसपासून मुक्तता मिळते. अशा या गरिबाचे बदाम म्हटल्या गेलेल्या शेंगदाण्याचे सेवन जर आपण नियमितपणे केले किंवा वरती सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून तीनदा जरी खाल्लेत तरी आरोग्यासाठी याचा भरपूर फायदा होतो.

 

News English Summary: Peanuts have the same health benefits as cashews. Peanuts are considered to be the cheapest plant source of protein. If you eat a handful of peanuts, it contains 426 calories, five grams of carbohydrates and 17 grams of protein. Peanuts also provide a variety of vitamins, such as E, C, and B.

News English Title: Benefits of peanuts improves digestion and increases appetite health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x