16 April 2025 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

वाराणसीत काळ्या बुरशीचं थैमान | एकाच इस्पितळात ३२ रुग्णांचा मृत्यू, ३० रुग्णांनी डोळे गमावले | मोदी कुठे व्यस्त होते पहा

black fungus

वाराणसी , ०४ जून | उत्तर प्रदेशात आधीच कोरोनाने थैमान घातलेले असताना आता काळ्या बुरशीने देखील हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत काळ्या बुरशीने अक्षरशः थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी वाराणसीत काळ्या बुरशीमुळे ८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. बीएचयू रुग्णालयात या रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे आतापर्यंत काळ्या बुरशीमुळे केवळ बीएचयू रुग्णालयातील ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३० रुग्णांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. यावरून राज्यातील अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो.

मृत रुग्णांना पोस्ट कोविड वॉर्डसोबतच ‘सुपर स्पेशालिटी ब्लॉक’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. या आठ रुग्णांशिवाय गुरुवारी काळ्या बुरशीनं त्रस्त असलेले आणखीन सात रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे, काळ्या बुरशीच्या रुग्णांचा एकूण आकडा १४५ वर पोहचलाय. यातील सात रुग्णांना रुग्णालयातून सुटी मिळालीय. तर १०६ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

बीएचयू रुग्णालयात काळ्या बुरशीच्या रुग्णांसाठी एक वेगळा वॉर्डही तयार करण्यात आला आहे. ४० – ४० बेडचे दोन वॉर्ड भरल्यानंतर एका नव्या वॉर्डात रुग्णांना दाखल केलं जातंय. बीएचयू सर सुंदरलाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. के के गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळी बुरशीच्या रुग्णांसाठी रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. रुग्णांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे नवे वॉर्ड बनवण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलंय.

एकाबाजूला काल वाराणसी काळ्या बुरशीच्या आजाराने हादरली तेव्हा मोदी CBSC परीक्षा रद्द केल्याचा आनंदात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत ऑनलाईन हास्य विनोदात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी बेसावध राहिलेले मोदी पुन्हा काळ्या बुरशी बाबत देखील तीच चूक करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

News English Summary: While Uttar Pradesh has already been plagued by corona, now the black fungus has also started wailing. What is special is that Modi’s Lok Sabha constituency of Varanasi is literally plagued by black fungus.

News English Title: Black fungus has also started wailing Uttar Pradesh with major impact in Varanasi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या