27 December 2024 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Health First | जाणून घ्या ब्लॅक टी चे फायदे । नक्की वाचा

benefits of black tea

मुंबई ६ मे : बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृततुल्य पेय आहे. काही जणांना चहाची इतकी आवड असते की, दिवसभरात चहा न प्यायल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं. चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वाद होताना दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी (Black Tea) चे अनेक फायदे आहेत.अनेकवेळा काळ्या चहाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. खऱ्या अर्थाने एनर्जी वाढवण्याचं काम काळा चहा करतो.

दिवसा प्या ब्लॅक टी:
जर तुम्हाला काळा चहा आवडत असेल तर तुम्ही दिवसा हा चहा घेऊ शकता. रात्रीच्या वेळेस झोपण्याआधी ब्लॅक टी प्यायल्यास तुमची झोप उडू शकते. दिवसा तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील.

भोजनानंतर प्या ब्लॅक टी:
ब्लॅक टी जेवणानंतर घेतल्यास जेवण पचण्यास मदत होते. नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर ३० मिनिटांनी एक कप ब्लॅक टी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे निश्चितच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

थंडीच्या दिवसात प्या ब्लॅक टी:
ब्लॅक टी पिण्यासाठी शरद ऋतू आणि थंडीचा महिना खास आहे. या मोसमात ब्लॅक टी प्यायल्यास आपल्या शरीरास याचा फायदा होतो. दिवसभरात जेव्हाही चहा प्याल तो काळा चहा प्या.

वाढत्या वयासाठी फायदेशीर:
कमी वयाच्या लोकांपेक्षा वाढत्या वयाच्या लोकांना थंडीत चहा अधिक हवा असतो. शरीर गरम ठेवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही ब्लॅक टीचे सेवन करू शकता.

लक्षात ठेवा या गोष्टी:
जेव्हा ब्लॅक टी प्याल तेव्हा तो ताजा बनवून प्या.
टी बॅगचा वापर कमीत कमी करा
चहाच्या ताज्या पानांचा वापर करता येईल असे बघा

News English Summary: For many, tea is a nectarine drink. Some people are so fond of tea that if they do not drink tea during the day, they get headaches. Tea and coffee drinkers are always arguing about which is better. But there are many benefits of Black Tea over milk tea. Black tea is often used as a medicine. Black tea really boosts energy.

News English Title: Black tea is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x