5 November 2024 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Good News | BMC'च्या ग्लोबल टेंडरवला ३ पुरवठादारांकडून प्रतिसाद | स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार

Vaccination

मुंबई, १९ मे | राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहेेेे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरवर तीन पुरवठादारांना रस असून रशियन स्पुतनिक लस उपलब्ध करण्यास तयार असल्याचं वृत्त आहे. मुंबई महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला तीन पुरवठादारांनी रस दाखवला आहे. संबधित पुरवठादार स्फुतनिक लसींचा पुरवठा करू शकणार आहेत. मात्र, या पुरवठादारांच्या कागदपत्रांची पूर्तता होणे अजून बाकी आहे. मुंबई महापालिकेनं कालच हे टेंडर भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढवलीय. येत्या सात दिवसांत केंद्राने जर इतर लसींच्या वापराला परवानगी दिली तर त्या कंपन्याही हे टेंडर भरु शकतील.

लस आयात करण्यासाठी 7 अब्ज खर्च येईल:
महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी बुधवारी एका मुलाखतीत सांगितले की, मुंबई देशातील पहिले असे शहर आहे जे स्वतंत्रपणे लसींची आयात करणार आहे. लस आयात करण्यासाठी बीएमसी सुमारे 7 अब्ज रुपये (96 मिलियन डॉलर) खर्च करेल.

18-44 वर्षांच्या लोकांसाठी हवे आहेत 1 कोटी डोस:
आतापर्यंत लंडनस्थित तालिसिन इंटरनेशनल लिमिटेड आणि हैदराबादस्थित दोन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. तिन्ही कंपन्या स्पुतनिकचे अधिकृत वितरक आहेत. चहल यांनी सांगितले की, मुंबईत 18-45 वयोगटातील 50 लाखाहून अधिक लोक राहत आहेत, यांच्यासाठी एक कोटी डोस आवश्यक आहेत.

 

News English Summary: Three suppliers are interested in the Mumbai Municipal Corporation’s global tender and it is reported that Russia is ready to provide Sputnik vaccine. Three suppliers have shown interest in the global tender issued by Mumbai Municipal Corporation. Relevant suppliers will be able to supply sputum vaccines.

News English Title: BMC got response from three suppliers of vaccine after Global tender issued news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x