23 February 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबईत मॉलमध्ये जाणार आहात? | 22 मार्चपासून प्रवेशाआधी निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार

BMC, Covid 19, Shopping malls

मुंबई, १९ मार्च: महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना राज्य सरकारने लोकांच्या हालचालीवर कडक निर्बंध लादले आहेत. कोविड प्रकरणातील वाढ रोखण्याच्या ताज्या हालचालीत बृहन्मुंबई महानगरपालिकाने शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड-19 नकारात्मक अहवाल अनिवार्य केला आहे. दरम्यान, 22 मार्चपासून नागरिकांना मुंबईतील कोणत्याही मॉलला भेट द्यायची असल्यास त्यांना आपला कोरोना नकारात्मक असल्याचा अहवाल दाखवावा लागणार आहे. संबंधित व्यक्तीकडे नकारात्मक अहवाल नसल्यास त्यांना शॉपिंग सेंटरमध्येचं आपली अँन्टीजेन चाचणी करावी लागेल.

यासाठी मुंबईतील सर्व मॉल्समध्ये लवकरचं रॅपिड अँटीजेन चाचणीची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. याच उद्देशाने मॉल्सच्या प्रवेशद्वाराजवळ एक पथक नेमण्यात येईल, असंही बीएमसीने सांगितलं आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून सर्व मॉल्ससाठी स्वॅब संकलन केंद्र सक्तीचे करण्यात आलं आहे. यासाठी मॉलच्या प्रवेशद्वारावरच पथक नियुक्त केलं जाणार असून, याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असं,” अशी माहिती काकाणी यांनी दिली.

 

News English Summary: The BMC has made the Covid-19 negative report mandatory for access to shopping malls. Meanwhile, from March 22, citizens will have to show that their corona is negative if they want to visit any mall in Mumbai. If the person concerned does not have a negative report, they will have to test their antigen at the shopping center.

News English Title: BMC has made the Covid 19 negative report mandatory for access to shopping malls news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x