20 April 2025 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

खरंच की चिकटा-चिकाटीचा ट्रेंड? | नाशिकनंतर परभणीतही लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटले नाणे

Vaccination

परभणी, ११ जून | नाशिक येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज परभणीत झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे शरीर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षून घेत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे? हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा गजानन पाटेकर करत आहेत.

चष्म्याच्या व्यवसायात असलेले गजानन पाटेकर यांनी 7 मे रोजी कोरोनाची ‘कोविशील्ड’ ही लस घेतली आहे. मात्र, काल गुरुवारी नाशिक येथील अरविंद सोनार या 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर त्यांनी शरीराला धातूची नाणी आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा केल्याची बातमी पाटेकर यांनी पाहिली. त्यानंतर सहजच म्हणून त्यांनी सुद्धा हा प्रयोग स्वतःवर करून पाहिला. तेव्हा त्यांनी देखील स्वतःच्या शरीराला काही नाणे लावून पाहिले तर ते चिटकले. त्यानंतर त्यांनी काही स्टीलच्या वस्तू देखील शरीराला लावून पाहिल्या, त्यादेखील चिटकल्या. शिवाय चाव्या पण चिटकत होत्या. हा प्रकार त्यांना स्वतःलाही गोंधळून टाकणारा ठरला.

दरम्यान, पाटेकर यांच्या या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सध्या परभणीतील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पाटेकर यांचे मित्र त्यांना फोन लावून किंवा प्रत्यक्ष भेटत आहेत. त्यांच्या या प्रकाराबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमका हा काय प्रकार आहे, याबाबत तज्ज्ञ व्यक्तीच माहिती देऊ शकतील, परंतु सध्या तरी हा विषय परभणीत कुतूहलाचा ठरला आहे.

 

News Summary: A 71-year-old man from Nashik has been found to be sticking metal coins and stainless steel objects after being vaccinated against corona. The same thing seems to have happened in Parbhani today. Gajanan Patekar, 41, of this place has also had the same experience. According to him, his body is attracted by coins and some steel objects. But he says it doesn’t bother him at all. What is the science behind this? Although it is difficult to say exactly, Gajanan Patekar is claiming that this type of thing happened after vaccination.

News Title: Body becomes a magnet after being vaccinated in Parbhani news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या