21 April 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | वेगाने धावणार टाटा मोटर्स शेअर्स, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Health First | गाजर ज्यूस पिण्याने होणारे आरोग्यास फायदे

benefits of carrot juice

मुंबई ८ मे : गाजरचा वापर अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, बी8, आयर्न, आणि कॉपरसारखी अनेक पोषकतत्व आढळतात. नियमित गाजरचा ज्यूस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. लठ्वपणा कमी करण्यासाठी सुद्धा गाजर उपयोगी आहे. गाजरचा ज्यूस पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

खालीलप्रमाणे गाजर ज्यूस पिण्याचे फायदे :
१) गाजर ज्यूस प्यायल्याने रक्त साफ होते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास ही गाजराचा ज्यूस मदत करतो.

२) गाजरचा ज्यूस नियमित प्यायल्याने कॅन्सरचा धोका उद्भवत नाही.

३) गाजरचा ज्यूसमध्ये बरेच पौष्टिक तत्त्वे असतात. ज्यामुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. गाजरच्या ज्यूसमध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं, मिरीपूड आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यावा त्यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात.

४) त्वचा, केस, नखे यांमध्ये असलेल्या समस्या देखील गाजरचा ज्यूस प्यायल्याने कमी होतात.

५) जर शरीरावर कोणताही भाग भाजला किंवा जळाला असेल तर त्यावर गाजरचा ज्यूस लावल्यास फायदेशीर ठरते.

६) मासिक पाळीच्या काळात गाजरचा ज्यूस जास्त फायदेशीर ठरतो.

७) गाजरच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन ए असतो. ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात.

८) व्हिटामिन ए च्या भरपूर प्रमाणात असल्याने ज्यूस नियमित प्यावा. त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून बचाव होतो.

९)  गाजरचा ज्यूस प्यायल्याने मूत्रसंबंधित समस्यांही होत नाहीत.

१०)  गाजरचा ज्यूस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वारंवार  होणारी सर्दी आणि खोकल्यापासून शरीराला सुरक्षित ठेवतो.

११) गाजरामध्ये व्हिटामिन सी देखील आढळते. त्यामुळे संधिवाताची समस्या उद्भवत नाही.

१२) गाजरामध्ये व्हिटामिन सीच्या प्रमाण भरपूर असलल्यामुळे गाजरचा ज्यूस दात बळकट होण्यास मदत करतो आणि  हिरड्यामधून होणाऱ्या रक्तस्त्रावाची समस्या देखील दूर करतो.

१३) गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने स्पर्मची गुणवत्ता वाढण्यासही मदत होते.

१४)  गाजरचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल मर्यादित राहते.

१५) गाजरचा ज्यूस गाळून पिऊ नये. त्यामुळे ज्यूसमध्ये असलेल्या फायबरचा ही शरीराला फायदा होतो.

News English Summary: Carrots are used to make many delicacies. It contains many nutrients like Vitamin A, C, K, B8, Iron, and Copper. Drinking carrot juice regularly makes the skin healthy. Carrots are also useful for reducing obesity. Learn the benefits of drinking carrot juice

News English Title: Carrot juice is beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या