25 November 2024 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | काजू खाल्ल्याने आपल्या आरोग्यास होणारे फायदे जाणून घ्या

benefits of cashew nuts

मुंबई ३० एप्रिल : ड्रायफ्रुट्स अर्थात सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यातही असे काही ड्रायफ्रुट्स आहेत, जे आपण अगदी रोजच्या पदार्थांमध्येदेखील वापरतो. मग ते मिठाई असो किंवा इतर स्वादिष्ट पदार्थ! सुक्यामेव्याबद्दल बोलले जात असताना, काजूला विसरून कसे बरे चालेल? सुक्यामेव्यातील महत्त्वाचा घटक ‘काजू’ जगभरात विविध प्रकारे वापरला जातो. अनेक गोड पदार्थांत चवीसाठी आणि सजावटीसाठी काजूचा वापर होतो. भारतात मसालेदार पदार्थांची चव वाढविण्यासाठी देखील काजू वापरले जातात. काजूचा वापर केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही तर, शरीराच्या अनेक समस्या कमी करण्यात देखील काजू महत्त्वाचा ठरतो

काजूचे नियमित सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात. काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि लोहाचे गुणधर्म आहेत. म्हणून काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. रोज थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात

१) काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी,के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.

२) काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात. काजू खाल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्रास्पिंग पावर देखील वाढते. त्यामुळे लहान मुलांना काजू आवर्जून खायला द्यावेत.

३) काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो 100 टक्के कमी होतो आणि कालांतराने कमी होतो.

४) डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास रोज सकाळी उपाशी पोटी 4 काजू खावेत आणि त्यावर एक चमचा मध घ्यावं. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

५) नैराश्य आणि डिप्रेशनवर देखील काजू रामबाण उपाय आहे. मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या मुडस्विंग्सच्या वेळी देखील काजू खाल्याने चांगला फायदा होतो. काजूत आर्यन आणि ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात काजू अधिक फायदेशीर आहे.

६) काजूमुळे मेंदूतील सिरोटोनिनचं प्रमाण वाढतं, मानसिक स्थिती देखील सुधारते. त्यामुळे मानस्कि स्थैर्य खचलेल्या व्यक्तीाल आवर्जून काजू खायला दिले जातात.

७) काजूत हेल्थी फॅट्सच प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा यावर काजू फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन आणि विटामिनचं प्रमाण देखील जास्त आहे. तसेच काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

८) काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते.

९) काजूतील पोषकतत्वांमुळे पेशीच्या डीएनएचं रक्षण होतं. यामुळे अनेक पेशी निरोगी राहतात. त्यामुळे अधिक आजारांपासून मुक्तता मिळते

१०) काजूचं सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. त्यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर राहतात.

११) अशक्तपणा आला असेल किंवा काहीही काम केल्यास थकल्यासारखं वाटत असेल तर दररोज आपल्याजवळ काजू ठेवावेत.

१२) काजू शारीरिक आणि मामसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

News English Summary: Dried fruits are considered to be very beneficial for health. Cashews are used in many sweets for flavor and decoration. In India, cashews are also used to enhance the taste of spicy foods. The use of cashews is not only limited to eating, cashews are also important in reducing many problems of the body

News English Title: Cashew nuts are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x