27 December 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

CoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार

Cowin portal

नवी दिल्ली, १० मे | एकीकडे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणत केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१० मे) होणाऱ्या सुनावणीआधी केंद्र सरकारने आपल्या लसीकरण धोरणाचा बचाव केला आहे. केंद्र सरकार १०० टक्के खरेदी स्वत: का करत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने या आधी केली होती. यावर केंद्राने उत्तर दिलं की, “आम्ही ५० टक्के लस खरेदी स्वत: करण्याचं धोरण विचारपूर्वक बनवलं आहे.

४५ वर्षांवरील वयोगटासाठी आम्ही राज्यांना मोफत लस देऊ, परंतु १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्यांनी लस खरेदी करणं योग्यच आहे,” असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. अनेक मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं होतं. तसेच, कोरोना काळात केंद्र सरकारने काय केलं हे सांगावं असं देखील म्हटलं होतं

दरम्यान, भारतात 18+ वयोगटातील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. काही दिवसांपासून कोविन पोर्टल योग्यरित्या चालत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारीनंतर आता यात बदल करण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन ज्यांनी लसीकरणासाठी वेळ घेतला होता, पण काही कारणास्तव त्यांना लस घ्यायला जाता आले नाही. अशांना लस घेल्याचे मेसेज येऊ लागले. या तक्रारीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पोर्टलमध्ये बदल केले.

काय आहेत नवीन बदल ?
या नवीन बदलानुसार, व्हक्सीन रजिस्ट्रेशननंतर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली, तर तुमच्या मोबाइल नंबरवर 4 अंकी OTP येईल. या OTP ला लसीकरण केंद्रावर दाखवावा लागेल. या ओटीपीद्वारे तुम्ही अपाइंटमेंट घेतल्याचे सिद्ध होईल. यामुळे व्हॅक्सीनेशच्या डेटामध्येही काही गडबड होणार नाही.

का केला बदल ?
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यात सांगण्यात येत होते की, ज्यांनी अपॉइंटमेंट बुक केली, पण लस घेतली नाही. अशा लोकांना लस घेतल्याचे मेसेज येऊ लागले आणि त्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील जारी होऊ लागले. या तक्रारीनंतर मंत्रालयाने या पोर्टलमध्ये बदल केले. यानुसार, आता ओटीपीद्वारे लस घेतल्याची पुष्टी होईल.

पोर्टलवर अजून काही बदल झाले ?
हो, पोर्टलवर अजून बदल झाले आहेत. OTP शिवाय कोविन पोर्टलच्या डॅशबोर्डमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता अपॉइंटमेंट घेण्यासाठी पिनकोड किंवा जिल्ह्याचे नाव टाकल्यानंतर 6 नवे ऑप्शन ओपन होतील. या पर्यायांमधून वयोगट (18+ किंवा 45+), व्हॅक्सीनचा प्रकार (कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), फ्री किंवा पेड व्हॅक्सीन निवडू शकता. या बदलानंतर आता तुम्हाला कोणती व्हॅक्सीन घेतली, याची माहितीदेखील मिळेल.

बदलानंतर कशी झाली रजिस्ट्रेशन प्रोसेस ?

  1. सर्वात आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरुन http://cowin.gov.in एंटर करुन कोविन पोर्टलवर जा.
  2. तुमच्या स्क्रीनच्या उजब्या बाजुला Register / Sign In Yourself वर क्लिक करा.
  3. तुमचा मोबाइल नंबर एंटर करुन Get OTP पर क्लिक करा.
  4. मोबाइलमध्ये आलेलाल OTP एंटर करुन वेरिफाय करा.
  5. यानंतर व्हॅक्सीनसाठी रजिस्टर करुन तुमचा फोटो आयडी प्रूफ, नाव, जेंडर आणि जन्मतारीख टाका.
  6. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घ्या.

 

News English Summary: Vaccination of all 18+ year olds has started in India. This requires registration on the Cowin portal. There had been a number of complaints over the past few days that the Cowin portal was not functioning properly. Changes have now been made following this complaint.

News English Title: Changes in Cowin portal OTP to be shared at the time of vaccination option to choose between vaccines news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x