Health First । ‘चेस्ट कंजेशन’ । छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे नक्की कशामुळे होते? - नक्की वाचा
मुंबई, १८ ऑगस्ट | छातीवर दडपण आले, छातीत भरून येणे किंवा छातीत जडपणा जाणवला की आपण एकदम घाबरून जातो त्याचा संबंध थेट हृदयविकाराची जोडून आपल्याला नक्की काय झाले आहे अशी भीती वाटते. परंतु प्रत्येक वेळी छातीवर दडपण आले म्हणजे तो हृदय विकार नसतो. सर्दी, खोकला, छातीत कफ होणे या कारणांमुळे सुद्धा छातीवर दडपण येऊ शकते. छातीवर दडपण आले असण्याची अनेक लक्षणे दिसून येतात. आज आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.
छातीवर दडपण आल्यासारखे कशामुळे वाटते?
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाल्यास छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. सर्दी, खोकला झाला की तसेच छातीत कफ साठला की छातीवर दडपण आल्यासारखे वाटते.
ह्याशिवाय खालील कारणांमुळे देखील छातीवर दडपण आल्यासारखे वाटू शकते:
१. चिंता (स्ट्रेस):
खूप जास्त तणाव अथवा चिंता असेल तर छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. नैराश्य म्हणजेच डिप्रेशनचा सामना करणाऱ्या लोकांना देखील छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. अशावेळी जोरजोरात श्वास घेणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, डोके दुखणे, घाबरणे आणि स्नायू आखडल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात.
२. ऍसिडिटी:
बराच काळ पोट रिकामे राहिले की ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अन्नपचनासाठी लागणारे द्रव्य शरीरात तयार होते परंतु पोटात अन्न असेल तर त्या द्रव्यामुळे छातीत जळजळणे, जड वाटणे, गिळताना त्रास होणे, घशाशी आंबट चव वाटणे असे त्रास होतात.
३. स्नायूंचे आखडणे:
छातीच्या पिंजऱ्याजवळील स्नायू आखडल्यामुळे देखील छातीवर दडपण येऊ शकते. छातीच्या पिंजऱ्यातील हाडांना बांधून ठेवणारे स्नायू जर दुखावले तर असा त्रास होऊ शकतो. अशावेळी छातीत सूज येणे, दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे देखील दिसतात.
४. न्युमोनिया:
न्युमोनिया हे छातीत जड वाटण्याचे प्रमुख आणि गंभीर कारण आहे. आपली फुफ्फुसे एखाद्या स्पंज प्रमाणे असतात. आपल्या फुफ्फुसांमध्ये शरीराला ऑक्सिजन पुरवण्यासाठी म्हणून ज्या हवेच्या पोकळी असतात त्यात इन्फेक्शनमुळे पाणी भरले कि श्वासोच्छवास घेणे अवघड होते तसेच छातीवर दडपण येते. इन्फेक्शन चे प्रमाण वाढले की छातीत दुखणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, ताप येणे थंडी वाजून येणे अशी लक्षणे दिसतात.
५. दमा:
एखाद्या व्यक्तीस दम्याचा आजार असेल तर त्यांना वारंवार छातीवर दडपण येण्याचा अनुभव येतो. छातीतून घरघर आवाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि खोकला येणे अशी लक्षणे देखील दमा असेल तर दिसतात.
६. अल्सर:
पोट आणि आतड्यांमध्ये होणाऱ्या जखमा म्हणजे अल्सर. अल्सर झाला असेल तर अन्नपचन अवघड होऊन बसते. अशावेळी जेवण झाल्यानंतर अन्न नीट न पचल्यामुळे छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. पोट जड होणे, ढेकर येणे असे त्रास देखील होतात.
वारंवार छातीवर दडपण येऊ नये म्हणून काय करावे?
छातीवर दडपण येण्याचा त्रास होऊ नये म्हणून आहार तसेच जीवनशैली यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.
आहार खालील प्रमाणे घ्यावा:
१. विटामिन ‘सी’ युक्त आहार जसे की लिंबू संत्री आणि इतर आंबट फळे घ्यावा.
२. भोजन परिपूर्ण असावे त्यामध्ये डाळी आणि भाज्या, कडधान्ये यांचा समावेश असावा.
३. भरपूर प्रमाणात प्रोटीन युक्त आहार घ्यावा. त्यासाठी सर्व डाळी, सोयाबीन, पनीर आणि अंडी यांचा समावेश आहारात असावा.
४. दिवसभरात कमीत कमी दीड लिटर पाणी प्यावे. त्यामुळे कफ पडून जाण्यास मदत होते.
५. त्या त्या ऋतुमध्ये मिळणारी फळे अवश्य खावीत.
६. शिळे अन्न खाऊ नये.
७. तेलकट, मसालेदार आणि पचायला जड असणारे अन्न खाऊ नये.
८. योग्य आहार आणि व्यायाम असणारी जीवनशैली ठेवावी. वेळी-अवेळी खाणे, अतिथंड पदार्थ खाणे टाळावे.
छातीत धडधडणे ही तक्रार बऱ्याच वेळा गंभीर आजाराची निदर्शक नसली तरी कधी कधी जीवाला धोका असणाऱ्या विकाराचे लक्षणही असू शकते. शारीरिक तपासणी आणि किमान इलेक्ट्रोकार्डिऑग्रॅम काढणे हे धडधड होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आवश्यक आहे. अनेकांना या नंतर जास्त महाग तपासण्या करण्याची गरज पडेलही. परंतु, सरसकट सर्वांना जास्त तपासण्यांची गरज नसते. रुग्णाच्या तोंडून त्याच्या तक्रारीचे यथायोग्य वर्णन काळजीपूर्वक ऐकणे हेच फार महत्त्वाचे असते. शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आता धडधड होणे या तक्रारीचे निर्मूलन प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत नक्की होऊ शकते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Chest Injection symptoms in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS