27 December 2024 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

मुलांना कोरोना झाल्यावर घरी कसे उपचार शक्य | आरोग्य मंत्रालयाची मुलांच्या देखभाल संदर्भात माहिती

India corona pandemic

नवी दिल्ली, १९ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी देशभरात सर्वाधिक 4,525 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी, सोमवारी 4,334 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, देशात नवीन संक्रमितांचे आकडे दिलासा देणार आहे. मंगळवारी देशभरात 2 लाख 67 हजार 44 नवीन रुग्ण आढळले, तर 3 लाख 89 हजार 566 रुग्ण ठीक झाले. यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत एक लाख 27 हजार 109 ने घट झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक मुलांचा उपचार घरात राहून करता येईल. मंत्रालयाने मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची देखभाल करण्याबाबत गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये म्हटले की, कोरोना संसर्ग झालेल्या बहुतेक मुलांमध्ये कोणेतेही लक्षण नाही, किंवा एकदम हलके लक्षण आढळून येत आहेत.

Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या मुलांची देखभाल:
आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, लक्षण नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह मुलांची घरातच देखभाल करता येते. कोरोना झालेल्या मुलांमध्ये काही दिवसानंतर घशात खवखव, सर्दी आणि खोकल्यासारखे लक्षण दिसू शकतात. काही मुलांमध्ये पोटदुखीची समस्यादेखील येऊ शकते. या मुलांना घरातच आयसोलेट करुन लक्षणांच्या आधारे उपचार केला जाऊ शकतो.

लक्षण नसलेल्या मुलांच्या ऑक्सिजन लेव्हलवर ऑक्सीमीटरने सतत लक्ष असू द्या. जर ऑक्सिजन लेव्हल 94% पेक्षा कमी झाली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. Congenital heart disease(जन्मापासून ह्रदयाचा आजार) chronic lung disease (अनेक वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार), chronic organ dysfunction (एखादा अवयव काम न करणे किंवा वजन जास्त असणे) अशा मुलांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घरी उपचार करा.

काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेट्री सिंड्रोम (MIS-C):
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेट्री सिंड्रोम (MIS-C) नावाचा नवीन सिंड्रोम पाहण्यात येत आहे. अशा मुलांना सतत 38 डिग्री सेल्सियस म्हणजेच 100.4 ड्रिग्री फेरनहाइटपेक्षा जास्त ताप असते. अशा काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या उपचाराची गरज भासते.

 

News English Summary: In the second wave of corona, a large number of children are infected with corona. In such a situation, the Union Ministry of Health has said that many children can be treated at home. The ministry has issued guidelines on how to care for children after they have been infected with the corona.

News English Title: Children covid 19 care guidelines at home news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x