Cholera symptoms and Treatment | 'कॉलरा' आजारावर त्वरित उपचार गरजेचे | लक्षण व उपचार - नक्की वाचा

मुंबई, २१ ऑगस्ट | कॉलरा या आजाराला पटकी असेही म्हणतात. हा एक जिवाणूजन्य रोग असतो. जो प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होतो. या आजारामध्ये रुग्णाला तीव्र जुलाब, अतिसार आणि उलट्या झाल्याने शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे या आजारावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते.
‘कॉलरा’ आजारावर त्वरित उपचार गरजेचे, लक्षण व उपचार (Cholera symptoms and Treatment in Marathi) :
व्हिब्रियो कॉलेरी नावाच्या जिवाणूमुळे हा रोग होतो. व्हिब्रियो कॉलेरी हे दूषित अन्न आणि पाणी यामध्ये प्रवेश करतात. ज्यामुळे रुग्णास पातळ पाण्यासारखे तीव्र जुलाब आणि अतिसार होऊ शकतो. इतर साथीच्या रोगाप्रमाणे हा रोग दुसरीकडे पसरत नाही. याची काही लक्षणे आहेत जसे की पोटात अतिशय वेदना होणे, वारंवार पातळ शौचास होणे, मळमळ आणि उलट्या होणे इत्यादी. याशिवाय शरीरातील पाणी कमी होऊन अशक्तपणा जाणवणे, तोंड डोळे व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होणे, नाडीची गती वाढणे.
यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून काही अँटी बायोटिक दिली जातात आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नारळाचे पाणी, भाताची पेज आणि इतर द्रव पदार्थ खाणे असे उपाय केले जातात.
कॉलरा आजारावरील उपचार (Cholera treatment) :
कॉलरात जुलाब झाल्याने तसेच उलट्यांमधून शरीरातील पाण्याची होणारी झीज भरून काढणे गरजेचे असते. दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. शरीरातील कमी झालेली पाणी व क्षार घटकांची पूर्तता करण्यासाठी रीहायड्रेशन सलाईन, झिंक सप्लिमेंट दिले जाते. तसेच यावर जिवाणू कमी करण्यासाठी अँटीबायोटिक्स औषधे दिली जातात.
पातळ शौचास व उलट्या होत असल्यास शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून रुग्णाला वरचेवर पाणी तसेच नारळाचे पाणी, भाताची पेज किंवा इतर द्रवपदार्थ भरपूर द्यावेत. जलसंजीवनी (ओआरएस) द्यावी. ओआरएस पावडर नसल्यास साखर, मीठ व पाण्यापासून घरीच जलसंजीवनी करून रुग्णास देता येते.
घरीच जलसंजीवनी करण्यासाठी स्वच्छ 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ चांगले एकजीव करावे. ही जलसंजीवनी रुग्णास वरचेवर थोडी थोडी देत राहावी. त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण संतुलित राहते व रुग्ण बरा होतो. एकदा केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी वापरू नये. दुसऱ्या दिवशी याचे पुन्हा नवीन मिश्रण करावे व ते वापरावे. (Cholera symptoms and Treatment in Marathi)
कॉलरा पेशंटसाठी असा द्यावा आहार :
रुग्णाला खाण्याकरिता साधे जेवण द्यावे. उकळवून गार केलेले पाणी द्यावे. मसालेदार, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ असलेले खाणे टाळावे. अर्धवट शिजलेले, शिळे अन्न, बाहेरील पदार्थ खाऊ नये.
कॉलरा म्हणजे पटकी रोग प्रतिबंधात्मक उपाय (Cholera Prevention Tips) :
कॉलराची लागण होऊ नये यासाठी काय करावे, पटकीपासून बचाव कसा करावा, कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
* परिसरात कॉलराची साथ आली असल्यास अधिक काळजी घ्यावी.
* फिल्टरचे पाणी किंवा उकळवून गार केलेले स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे.
* जेवणापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
* शौचविधीनंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
* अर्धवट शिजलेले, कच्चे, शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत.
* बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
* भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत.
* घराची व आजूबाजूची स्वच्छता राखावी.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Cholera symptoms and Treatment in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB