13 January 2025 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

कोरोना लसीकरण | Co-WIN अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार | जाणून घ्या प्रक्रिया

Co WIN app, corona vaccination, registration process

नवी दिल्ली, ०३ जानेवारी: देशात कोविड-19च्या लसीकरणाची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे; मात्र ती सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून को-विन (Co-WIN) हे मोबाइल अ‍ॅप सरकारकडून विकसित केलं जात आहे. त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मोड्युल, रजिस्ट्रेशन मोड्युल, व्हॅक्सिनेशन मोड्युल, बेनिफिशियरी अ‍ॅक्नॉलेजमेंट मोड्युल आणि रिपोर्ट मोड्युल अशी पाच मोड्युल्स या अॅपमध्ये असतील. सामान्य नागरिकांना रजिस्ट्रेशन मोड्युलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येईल. को-मॉर्बिडिटीबद्दलची (Co-morbidity) सर्वेक्षणातून मिळालेली, तसंच स्थानिक यंत्रणेकडची माहिती ‘को-विन’ अ‍ॅपमध्ये अपलोड केली जाणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

CoWIN App’वर लसीसाठी नोंदणी कशी कराल?

  • जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाहीत त्यांना CoWin अ‍ॅपवर नोंदणी मॉड्यूलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येणार आहे. CoWin अॅप गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी हे अॅप्लिकेशन अद्याप लाँच झाले नाही.
  • Co-WIN वेबसाइटवर स्वत: नोंदणीसाठी 12 फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स (Voter ID, Aadhar card, driving license, passport आणि Pension document) यापैकी कोणतेही एक आवश्यक असेल.
  • ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळेल, त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल.

 

News English Summary: The process of vaccination of Covid-19 is yet to begin in the country; But it should go smoothly and without any hassle, so the central government is planning. As part of this, Co-WIN is a mobile app being developed by the government. This will enable citizens to register for vaccination and will also make it easier for government agencies to review the vaccination program. The app is expected to be available on Google Play Store, Apple App Store as well as Geo phones. The app will have five modules namely Administrator Module, Registration Module, Vaccination Module, Beneficiary Acknowledgement Module and Report Module.

News English Title: Co WIN app corona vaccination registration process news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x