राज्यात मृत्यूंच्या आकडेवारीत तफावत? | नाही, उलट दैनंदिन तांत्रिक अडचणींमुळे आकडा अधिक दिसतोय - सविस्तर
मुंबई, ११ जून | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य अनलॉक होत असताना कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू आणि दैनंदिन मृत्यूच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यावर मृत्यू लपवण्याचे आरोप करत असले तरी प्रत्यक्षात जास्तीचे मृत्यू दाखवण्याचा प्रकार समोर आला. यात प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा सरकारने २५१८ अधिक मृत्यू दाखवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्य सरकार कोरोनाबाबत लपवाछपवी करत नसून सर्वकाही पारदर्शी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, राज्य सरकार व आरोग्य विभागाकडून दररोज कोरोनाबाबतची सविस्तर आकडेवारी जारी केली जाते. ही दोन्ही आकडेवारी तपासल्यास मृत्यूसंख्येत मोठा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार आकडेवारी लपवतंय असं म्हणण्यापेक्षा माहिती संकलित करण्याच्या त्रुटीतून उलट जास्त मृत्यू दाखवले जातं आहेत असं समोर येतंय. त्यामुळे विरोधकांचा दावा देखील फोल ठरतोय.
दैनंदिन माहिती आणि आकडेवारी कशी संकलीत होते:
पॉझिटिव्ह व्यक्तीची माहिती प्रयोगशाळा आरटीपीसीआर अॅप आणि केंद्राच्या कोव्हीड-१९ पोर्टलवर भरते. त्यास आयसीएमआर आयडी दिला जातो. पोर्टलवर तो त्या जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्ण दिसायला लागतो. तो उपचार घेत असलेले रुग्णालय त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करते. प्रत्येक रुग्णालयाला पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो. नेमकी येथेच गफलत होते, असे राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
विशेषत: खासगी रुग्णालये मृतांची आकडेवारी पोर्टलवर वेळेत अपलोड करत नाहीत. त्यामुळे काही मृत्यूचे आकडे प्रलंबित राहतात. नंतर जिल्हा स्तरावरील एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) अधिकारी ही माहिती पोर्टलवर टाकतात. यामुळे त्या दिवशीच्या मृत्यूमध्ये मागील मृत्यू एकत्रित करून एकूण मृत्यूंची संख्या दाखवली जाते. त्यात तफावत येते.
Maharashtra | कोरोना बळींच्या आकडेवारीततब्बल 2518 मृत्यूंची तफावत, सहा दिवसांतील फरक, तांत्रिक अडचणीचा परिणाम pic.twitter.com/cJiKxp0SW6
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 11, 2021
कोरोनाची आकडेवारी अभूतपूर्व आहे. अनेक रुग्णालयात ती हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. काही ठिकाणी संगणक साक्षरतेचा प्रश्न आहे. अनेकदा सॉफ्टवेअर हँग हाेते किंवा ओपन होत नाही. या साॅफ्टवेअरमध्येही काही त्रुटी आहेत. माहिती अचूक आहे, पण ती वेळेत अपलोड होत नाही. अनेक दिवसांची आकडेवारी एकत्रित अपलोड केली जाते. त्यामुळे ही तफावत दिसून येते असं राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केलं आहे.
देशातील करोना मृतांपैकी प्रत्येक तिसरा ते चौथा मृत्यू हा महाराष्ट्रातील आहे. जे राज्य एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू नोंद करत आहे, त्या राज्याला मृत्यू लपवायचे असते तर के व्हाच लपवले असते. २६ मे ते ९ जून या पंधरा दिवसांच्या काळात राज्याच्या करोनाविषयक माहितीमध्ये तब्बल ६५५२ करोना मृत्यू समाविष्ट करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, त्यामुळे मृत्यू लपवले असे म्हणणे हा यंत्रणेवरील आरोप आहे, असे राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शासन असो की प्रशासन मागील वर्षभरात मृत्यू किं वा रुग्णसंख्या लपवण्याबाबत कोणताही दबाव आरोग्य यंत्रणेवर नाही. त्यामुळे माहिती लपवण्याचा प्रश्नच येत नाही. सहव्याधी असलेल्या रुग्णांचे मृत्यू झाले असता त्यांच्या मृत्यूची नोंद सहव्याधीने मृत्यू अशीच के ली जाते, करोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात आवश्यक बदल के ला जातो, मात्र त्याचा अर्थ मृत्यू किं वा आकडेवारी लपवली असा होत नाही, असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केले.
News Summary: As the state unlocked after the second wave of corona, there was a discrepancy between the total deaths caused by corona and the daily death statistics. Opposition leader Devendra Fadnavis has accused the state of concealing his death, but in reality, it has come to light. The statistics show that the government showed 2518 more deaths than actual deaths. The state government is not hiding about the corona and the government claims that everything is transparent. However, detailed statistics on corona are released daily by the state government and the health department. Examining these two figures reveals a big difference in the number of deaths.
News Title: Corona Death Patient Corona Virus Infection in Maharashtra state news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार