वय वर्ष ४५ पेक्षा अधिक | आजपासून कोरोना लसीकरण | हे आहेत तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं
नवी दिल्ली, ०१ एप्रिल: देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.
सध्या रोज दिलेल्या डोसची सरासरी २१ लाख आहे. ही संख्या ५० लाखांवर जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात ५० हजार केंद्रांवर एक दिवसात १०० ते २०० डोस देण्याची व्यवस्था आहे. हे लसीकरण वेगाने व्हावे म्हणून खासगी रुग्णालयांना सहभागी करून घ्या, असे राज्यांना सूचित करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये ४०% हून अधिक डोस खासगी रुग्णालयांत दिले जात आहेत.
- मी ४५ वर्षांवरील आहे. लस घेण्यासाठी काय करावे लागेल?
cowin.gov.in वर नोंदणी करा. लसीकरण केंद्राचा पर्याय निवडा. ऑनलाइन नोंदणी करू शकत नसाल तर केंद्रावर जा. नोंदणी करा. - लसीकरण केंद्रावर आरोग्यविषयक कागदपत्रे दाखवावी लागतील?
अजिबात नाही. - कोणते ओळखपत्र ग्राह्य असेल?
कोणतेही फोटो आयडी कार्ड. उदा. आधार, पॅन, मतदान ओळखपत्र. - मी नोकरदार. दिवसभर काम असते. डोसनंतर विश्रांती घ्यावी लागेल?
विश्रांतीची गरज नाही. परंतु, लस घेतल्यावर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ताप आलाच तर तापावर गुणकारी औषधे घेऊ शकता. - लसीचे साइड इफेक्ट कोणते?
दंडावर सूज येऊ शकते. तापही येऊ शकतो. हे सामान्य परिणाम आहेत. - खाण्यापिण्याचे पथ्य काय?
फक्त एकच लक्षात ठेवा, लस घेताना पोट रिकामे नसले पाहिजे. - लस घेतल्यावर व्यायाम किंवा जॉगिंग करू शकतो का?
नियमित दिनचर्येत बदल करू नका. मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित औषधे चालू असतील तर ती घेणे चालू ठेवा. - गर्भवती महिलांना लस देता येईल?
लस घेतल्यानंतर तीन महिने तरी गर्भधारणा होऊ देऊ नये. - लसीचा पहिला व दुसरा डोस यात नेमके किती अंतर ठेवणे चांगले आहे?
दोन प्रकारच्या लसी आहेत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन. कोविशील्डचा दुसरा डाेस ६ ते ८ आठवड्यांत घ्यायला हवा. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी अँटिबॉडी तयार होतात. कोव्हॅक्सिन डोस ४ ते ६ आठवड्यांनी घ्यावा. - कोणती लस घ्यावी याची निवड मी स्वत: करू शकतो का?
कोणत्या केंद्रावर कोणती लस आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हवी ती लस असलेले केंद्र निवडू शकता. दाेन्ही लसी चांगल्या आहेत. - लस घेतल्यानंतर मास्क आणि सुरक्षित अंतर किती दिवस पाळणे गरजेचे आहे?
जोवर सरकार देश कोरोनामुक्त घोषित करत नाही तोवर… जे सध्या तरी शक्य नाही. म्हणून मास्क आणि अंतर राखणे सोडणे म्हणजे कोरोनाला निमंत्रणच. - कोरोना झालेल्यांनीही लसीचा डोस घ्यायला हवा का?
होय, डोसमुळे शरीरात अँटिबॉडी प्रोटीन वाढतात. दुसरा फायदा म्हणजे लस घेतल्यावर संसर्ग झाला तरी गंभीर आजारी पडण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होऊन जाते. - जादा सर्दी आहे आिण थोडा तापही आहे. या स्थितीत लस घेऊ शकतो का?
चाचणी निगेटिव्ह असेल तर डोस घेऊ शकता. संसर्ग असेल तर मात्र डोस घेऊ नका. कोरोनातून बरे झाल्यानंतर ४-६ आठवड्यांनी लस घ्यायला हवी. - लस अनिवार्य नाही, तर मी लस घ्यायची नाही असा निर्णय घेऊ शकतो का?
होय, तुम्ही ठरवू शकता. परंतु, असे करून तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि समाजासाठी कायम धोका ठराल.
News English Summary: From today, all people over the age of 45 in the country will be able to get the dose of corona vaccine. Until now, only health workers and frontline workers, those with serious illness over 45 years and senior citizens above 60 years were vaccinated. Now the population participating in this vaccination campaign is going out for work. It is not possible for them to stay at home. Therefore, the government thinks that after April 1, India will be the most vaccinated country in the world.
News English Title: Corona vaccination for age above 45 will start from today in India news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो