23 February 2025 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | इंजेक्शनमध्ये लस न भरताच सुईने हवा भरत आहेत कर्मचारी | जेडीयू-भाजप सरकारचा भोंगळ कारभार

Vaccination

पाटणा, २५ जून | देशात लसीकरणावून आधीच सामान्य लोकं फेऱ्या मारून कंटाळलेले असताना दुसरीकडे अत्यंत बेजवाबदारपणाचे प्रकार समोरयेत आहेत . विशष म्हणजे लसींचा तुटवडा आणि पूर्ण झालेलं लसीकरण आकड्यातील विक्रम दाखविण्यासाठी असे धक्कादायक प्रकार केले जातं असावेत अशी देखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसाच एक प्रकार जेडीयू-भाजपाची सत्ता असलेल्या बिहारमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

एकाच दिवशी पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना लसीचे दोन्ही डोस दिल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले. तर कुठे एकाच दिवशी एकाच व्यक्तीला एक डोस कोवशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आल्याचा प्रकारही समोर आला. यानंतर आता बिहारच्या छपरामध्ये इंजेक्शनमध्ये लस भरताच सुई टोचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नर्सवर कारवाई करण्यात आली.

लसीकरणादरम्यान नर्स रिकामी इंजेक्शन टोचत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची पडताळणी केल्यास नर्सचा बेजबाबदारपणा समोर आला. त्यानंतर संबंधित नर्सला लसीकरण कार्यातून तातडीनं हटवण्यात आल्याची माहिती डीआयओ डॉ. अजय शर्मांनी दिली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या नर्सला नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांत नोटिशीला समाधाकारक उत्तर न दिल्यास तिच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.मात्र हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला नसता तर विचार करा हे किती जणांच्या बाबतीत घडलं असतं. कारण यावर जेडीयू-भाजप सरकारच्या आरोग्य यंत्रणाचं कोणतंही लक्ष नसल्याचं दिसतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Corona vaccination nurse uses empty syringe while vaccination in  Bihar recorded in camera news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x