18 November 2024 3:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

कोरोना लसीकरण | मुंबई महापालिका प्रतिदिन १२ हजार मुंबईकरांना लस देणार

Corona vaccination, Mumbai BMC

मुंबई, ४ जानेवारी: मुंबईत पालिकेकडून लसीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी होणार याविषयी अनेक मुंबईकरांमध्ये चर्चा आहे. अशा परिस्थितीत पालिकेची लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, मुंबईतील आठ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्याठिकाणीही आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याची लगबग सुरू आहे. (Corona vaccination planning in Mumbai BMC region)

विशेष म्हणजे, कोरोनावरील लस पालिकेस उपलब्ध होताच, त्यानंतर केवळ २४ तासांतच प्रत्यक्ष लसीकरण हाती घेतले जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा हाती घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर घटकांतील कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. तर, तिसऱ्या टप्प्यांत सुमारे ५० लाख मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. त्यात ५० वर्षे वयोगटातील ३० लाख नागरिकांचा समावेश असेल. याच टप्प्यात अल्पवयीन मुलांनादेखील लस दिली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी आठ केंद्रे सज्ज केली असून त्यापैकी केईएम, नायर, कूपर, सायन रुग्णालयात दररोज सुमारे दोन हजार व्यक्तींना लस दिली जाणार आहे. वांद्रेतील भाभा रुग्णालय, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील चार केंद्रात दररोज प्रत्येकी १,००० व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

दुसरीकडे, देशात कोविड-19च्या लसीकरणाची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे; मात्र ती सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून को-विन (Co-WIN) हे मोबाइल अ‍ॅप सरकारकडून विकसित केलं जात आहे. त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मोड्युल, रजिस्ट्रेशन मोड्युल, व्हॅक्सिनेशन मोड्युल, बेनिफिशियरी अ‍ॅक्नॉलेजमेंट मोड्युल आणि रिपोर्ट मोड्युल अशी पाच मोड्युल्स या अॅपमध्ये असतील. सामान्य नागरिकांना रजिस्ट्रेशन मोड्युलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येईल. को-मॉर्बिडिटीबद्दलची (Co-morbidity) सर्वेक्षणातून मिळालेली, तसंच स्थानिक यंत्रणेकडची माहिती ‘को-विन’ अ‍ॅपमध्ये अपलोड केली जाणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

CoWIN App’वर लसीसाठी नोंदणी कशी कराल?

  • जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाहीत त्यांना CoWin अ‍ॅपवर नोंदणी मॉड्यूलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येणार आहे. CoWin अॅप गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी हे अॅप्लिकेशन अद्याप लाँच झाले नाही.
  • Co-WIN वेबसाइटवर स्वत: नोंदणीसाठी 12 फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स (Voter ID, Aadhar card, driving license, passport आणि Pension document) यापैकी कोणतेही एक आवश्यक असेल.
  • ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळेल, त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल.

 

News English Summary: Many Mumbaikars are discussing about the process of vaccination by the Mumbai Municipal Corporation. In such a situation, the preparations for vaccination of the municipality are almost complete and eight centers in Mumbai have been selected. Even there, the necessary infrastructure is being provided.

News English Title: Corona vaccination planning in Mumbai BMC region news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x