5 November 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

BMC Updates | मुंबईत पुढील २ दिवस कोरोना लसीकरण केंद्र बंद | ट्विट करून माहिती

Vaccination

मुंबई, १५ मे  | महाराष्ट्रात एकाबाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी एकूण ३९,९२३ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ६९५ मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, एका दिवसात ५३,२४९ रुग्ण पूर्ण बरे होऊन परतले आहेत. एकूण रुग्णसंख्या ५३,०९,२१५ झाली आहे.

औरंगाबाद | शुक्रवारी ६५१८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून ४५२४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, १३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या मराठवाड्यात ४२ हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे कंसात मृतांची संख्या : औरंगाबाद ६६५ (३३), जालना ९८५ (५), परभणी ४५८ (१६), हिंगोली ७८ (५), नांदेड २०८ (१३), उस्मानाबाद ४५८ (१५), बीड १११२ (२२).

 

News English Summary: In Maharashtra, on the one hand, the number of corona patients is increasing dramatically. On the other hand, shortage of corona vaccine has slowed down vaccination in the state. Against this backdrop, all corona vaccination centers in Mumbai will be closed for the next two days. Mumbai Municipal Corporation informed about this by tweeting.

News English Title: Corona vaccination will stop for next todays said BMC on tweet news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x